तुमचे वजन वाढत आहे किंवा तुम्हाला मधुमेह आहे. पण तुम्ही मिठाई टाळू शकत नाही का. त्यामुळे ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जास्त प्रमाणात मिठाईचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. ज्यामुळे अनेक शारीरिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. या समस्या टाळण्यासाठी, साखर आणि इतर गोड पॅकेज केलेल्या पदार्थांऐवजी आपल्या आहारात काही आरोग्यदायी पर्यायांचा समावेश करणे फारच उपयुक्त ठरते. त्यांच्या मदतीने तुम्ही मिठाईचा आस्वाद तर घेऊ शकालच शिवाय रक्तातील साखरसुद्धा नियंत्रणात राहील. त्यामुळेच आज आपण साखरेला पर्याय असणारे काही पदार्थ पाहणार आहोत. ज्यामुळे तुमचे वजनही वाढणार नाही. आणि तुमच्या रक्तातील साखरही वाढणार नाही.
मध हे सर्वात प्राचीन आयुर्वेदिक एक नैसर्गिक गोड पदार्थांपैकी एक आहे. ऑरगॅनिक मध त्याच्या अँटिऑक्सिडंट आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या गुणधर्मांसाठी ओळखला जातो. कच्चा मध त्याच्या नैसर्गिक आणि मूळ स्वरूपात सर्वोत्तम गोड द्रवांपैकी एक आहे. हे सॅलड, स्मूदी, ड्रिंक्स, टोस्ट आणि बऱ्याच पदार्थांसाठी डिप म्हणून वापरले जाऊ शकते. परंतु मध प्रमाणात घेतले पाहिजे.
बहुतेक फळे नैसर्गिकरित्या गोड असतात आणि साखरेची लालसा कमी करण्यास मदत करतात. त्यामध्ये पुरेशा प्रमाणात फायबर आणि इतर पोषक घटक आढळतात. ज्यामुळे दीर्घकाळ तुमचे पोट भरलेले असते. अशा प्रकारे तुम्हाला सतत भूक लागत नाही. केळी, द्राक्षे, आंबा, खजूर आणि ब्लॅकबेरी यांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो.
पारंपारिक मिठाईंसह विविध पदार्थांमध्ये खजूरचा वापर नैसर्गिक गोडवा म्हणून केला जात आहे. वाळलेल्या खजुरापासून साखर बनविली जाते. आणि साखरेचा सर्वात आरोग्यदायी पर्याय आहे. हे अनेक महत्त्वपूर्ण पोषक, फायबर आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध आहे. हे बेकिंग रेसिपी, स्मूदी, मॅरीनेड्स, ओटचे पीठ इत्यादींमध्ये वापरले जाऊ शकते.
नट आणि एवोकॅडोसारखे हेल्दी फॅट्स तुम्ही खाऊ शकता. त्यांचे सेवन केल्याने तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. तसेच ते मिठाईची लालसादेखील कमी करण्यास मदत करतात. अशा स्थितीत ट्रान्स फॅट टाळा आणि सॅच्युरेटेड फॅट मर्यादित करा. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही दुष्परिणामांशिवाय मिठाईचे सेवन करू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)