
What Not To Eat Thyroid Problems In Marathi : अस्वास्थ्यकर जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे बहुतेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या आजारांमध्ये थायरॉईड सर्वात सामान्य आहे. भारतातील दर १० व्यक्तींपैकी एका व्यक्तीला हा आजार झालेला आहे. थायरॉईडच्या बाबतीत, काही हार्मोन्स खूप जास्त किंवा खूप कमी तयार होतात.
थायरॉईडचे अनेक प्रकार आहेत. ज्यामध्ये हायपरथायरॉईडीझम, हायपोथायरॉईडीझम, थायरॉईडायटीस आणि हाशिमोटो थायरॉईडाइटिस यांचा समावेश होतो. हा त्रास टाळण्यासाठी औषधांसोबतच खाण्यापिण्याची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. थायरॉईडच्या रुग्णाने ज्या गोष्टी टाळल्या पाहिजेत त्याबद्दल येथे जाणून घेऊया.
क्रूसिफेरस भाज्यांमध्ये गॉइट्रोजेनचे प्रमाण जास्त असते. जर तुम्हाला थायरॉइडची समस्या असेल तर ब्रोकोली, पालक, कोबी आणि फ्लॉवर खाणे टाळा.
बीन्स, शेंगा आणि भाज्या यांसारख्या तंतुमय पदार्थांमुळे हायपोथायरॉईडच्या रुग्णांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. उच्च फायबर आहार, जसे की हिरव्या शेंगभाज्या आणि अख्खे धान्य(मूग, मट इ.), सामान्य पचन आणि हायपोथायरॉईडीझम औषध शोषण्याच्या शरीराच्या क्षमतेमध्ये व्यत्यय आणू शकतात. त्यामुळे संपूर्ण हिरव्या शेंगाभाज्या खाणे टाळावेत किंवा कमी खावेत.
हायपरथायरॉईडीझममध्ये, अनेक अन्नपदार्थ जळजळ वाढवणारे मानले जातात. हे अन्नपदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने थायरॉईड ग्रंथीमध्ये सूज येऊ शकते आणि स्थिती बिघडू शकते. त्यामुळे स्ट्रॉबेरी, पीच, रताळे आणि कसावा यांसारखे पिष्टमय पदार्थ टाळा, या व्यतिरिक्त जास्त साखर असलेल्या गोष्टी साखरेची पातळी आणि जळजळ वाढवू शकतात.
हायपर-थायरॉइडिझम म्हणजे जेव्हा शरीरात संप्रेरके आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात स्त्रवतात; तेव्हा हृदयाच्या ठोक्यांमध्ये चढ-उतार होतो. परिणामी, हृदयविकार उद्भवू शकतात. त्याचप्रमाणे जर हायपो-थायरॉइडिझमचे निदान वेळेवर झाले नाही तर काही वेळा मेंदूचे आझार होऊ शकतात.
ज्या लोकांना हायपोथायरॉईडीझम आहे त्यांनी बाजरी, शेंगदाणे किंवा पाइन नट्ससारखे भरपूर ड्रायफ्रुट्स खाणे टाळावे.
अहवालात असे म्हटले आहे की, सोया असलेले घटक बदलू शकतात आणि थायरॉईड औषधे योग्यरित्या शोषून घेण्याच्या शरीराच्या क्षमतेवर परिणाम करतात. त्यामुळे सोया चंक्स, सोया पनीर, सोया दूध यासारख्या गोष्टी खाणे टाळावे.
संबंधित बातम्या
