Side Effects Of Eating Almonds: आपण आजपर्यंत नेहमीच ऐकतो की, नियमित बदाम खाल्ल्याने आरोग्य उत्तम राहते. शिवाय विविध आजारसुद्धा दूर होतात. बदामात प्रोटीन, फॅट, जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, कॅल्शियम आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् यांसारख्या घटकांचा समावेश आहे. बदामाच्या सेवनाने मेंदूचा विकास होण्यासोबतच आणि शारीरिक आरोग्य सुधारते. याशिवाय त्वचाविकार, कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होऊ शकतो. असे अनेक फायदे असणारा बदाम आपण सर्वजणच दररोज खात असतो. परंतु आज आम्ही तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहोत जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. बदामचे जसे फायदे आहेत त्याचप्रमाणे त्याचे नुकसानसुद्धा आहेत. वाटलं ना आश्चर्य? पण हे खरं आहे. विविध आजारांच्या रुग्णांनी बदाम खाल्ल्यास विविध परिणाम दिसू शकतात.
आहार तज्ज्ञांच्या मते, किडनी स्टोनची अर्थातच मुतखड्याची समस्या असलेल्या लोकांनी बदाम खाणे टाळावे. कारण बदामामध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते, जे किडनी स्टोन तयार करण्यास कारणीभूत ठरते. याशिवाय बदामाच्या अधिक सेवनाने पित्ताशयाच्या आजाराचा धोकाही वाढू शकतो. त्यामुळे या रुग्णांनी बदाम खाणे शक्यतो टाळावे.
आजकाल अनेक लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. असे लोक दररोज रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी औषधे घेत असतात. अशा लोकांनी बदाम शक्यतो खाऊ नये. कारण बदामामध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळते. जे रक्तदाब नियंत्रित करणाऱ्या औषधांवर मात करून त्यांना निरुपयोगी बनवते. ज्यामुळे तुम्हाला त्या औषधांचा अजिबात उपयोग होत नाही. त्यामुळे या रुग्णांनी बदामाचे सेवन करायचे झाल्यास ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे.
बदलत्या जीवन शैलीमुळे सध्या अनेकांना लठ्ठपणाची समस्या भेडसावत आहे. शरीराचे वजन वाढल्याने लोक अनेक आजारांनी त्रासले आहेत. शिवाय वजन कमी करण्यासाठी विविध उपायही करत आहेत. अशा लोकांनी बदामांचे सेवन करू नये. वास्तविक, बदामामध्ये कॅलरीज आणि फॅटचे प्रमाण जास्त असते. अशा स्थितीत अतिसेवनाने शरीराचे वजन आणि लठ्ठपणा अधिक वाढू शकतो.
बहुतांश लोकांना पचनासंबंधी विविध तक्रारी असतात. ऍसिडिटी, बद्धकोष्ठता असे विविध पोटाचे आजार लोकांना असतात. अशा लोकांनी बदाम खाणे टाळावे. कारण बदामामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. अशा स्थितीत या लोकांनी बदामाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोटदुखी, गॅस, ब्लोटिंग, ॲसिडिटी आणि जुलाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, अनेकांना विविध प्रकारच्या अॅलर्जी असतात. तुम्हाला कोणतीही अॅलर्जीचा त्रास असला तरीही बदामाचे सेवन करू नका. असे केल्याने त्वचेवर पुरळ उठणे, सूज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. आणि खायचेच झाले तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. अशाने तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.
संबंधित बातम्या