Side effects of eating old pickle: जेवणासोबत दिले जाणारे लोणचे जेवणाची चव तर वाढवतेच शिवाय व्यक्तीची भूकही वाढवते. भारतीय कुटुंबांमध्ये दिसणारी लोणच्याची ही आवड लक्षात घेऊन घरातील स्त्रिया वर्षभर प्रत्येक ऋतूत वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे बनवतात. लोणचे बनवून वर्षभर साठवून ठेवण्याची प्रथा आजींच्या काळापासून चालत आली आहे. सर्वसाधारणपणे असे मानले जाते की, लोणचे जितके जुने असेल तितकी त्याची चव चांगली होते. जर तुम्ही आतापर्यंत यावर विश्वास ठेवला असेल तर डॉक्टरांकडून हे ऐकून तुम्हालासुद्धा मोठा धक्का बसू शकतो. डॉक्टरांच्या मते जुने लोणचे खाल्ल्याने चव वाढू शकते पण तब्येत नक्कीच बिघडू शकते. खूप आधी बनवलेले लोणचे खाल्ल्याने एखाद्या व्यक्तीला कर्करोगाचा अर्थातच कॅन्सरचा धोका वाढू शकतो. कॅन्सर इम्युनोथेरपिस्ट डॉ. जमाल ए. खान यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत ही मोठी माहिती दिली आहे.
कॅन्सर इम्युनोथेरपिस्ट आणि डेन्व्हॅक्स क्लिनिकचे संस्थापक संचालक डॉ. जमाल ए. खान सांगतात की, लोणचे जितके जुने असेल तितके आपल्या शरीरात कॅन्सरसारखे आजार होण्याचा धोका जास्त असतो. डॉ. जमाल सांगतात की, ज्या कुटुंबांमध्ये लोणच्याचं जास्त सेवन केलं जातं, त्या लोकांमध्ये कॅन्सरची जास्त प्रकरणं आढळून आली आहेत. त्यामुळे नियमित लोणचे खात असाल तर त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
कॅन्सर इम्युनोथेरपिस्ट डॉ. जमाल ए. खान सांगतात की, लोणचं जितकं जुनं असेल तितकं ते फ्री रेडिकल्स तयार करतं. खरं तर लोणच्यासारखं कुठलंही अन्न जे जास्त काळ बनवून ठेवलं जातंय त्यामुळे फ्री रेडिकल्स अधिक प्रमाणात तयार होतात. त्यात मिसळलेल्या मसाल्यांमुळे लोणचेही एकप्रकारे खराब होत आहे. अशावेळी बराच काळ साठवून ठेवलेले लोणचे फ्री रेडिकल्स जास्त प्रमाणात बनवतात . डॉ. जमाल म्हणाले की, येथे फ्री रेडिकल्स म्हणजे अन्नातून ऑक्सिजन काढून टाकणारी गोष्ट. तथापि, हे ऑक्सिजन O२ नाही, तर फक्त ओ आहे. ज्यामुळे शरीरात तयार झालेल्या पेशींच्या भिंतीचे नुकसान होऊ लागते.
भारतीय लोकांची लोणच्याची आवड पाहता लोणचे खायला आवडत असेल तर ते जास्त काळ ठेवू नका, असा सल्ला डॉ. जमाल ए. खान देतात. डॉ. जमाल यांनी दोन प्रकारच्या लोणच्यांचा उल्लेख करून सांगितले की, "लोणचे दोन प्रकारचे असतात एक लोणचे आहे जे तुम्ही काल किंवा आज घातले आहे. असे लोणचे खाण्यास पूर्णपणे सुरक्षित असते. अशा लोणच्याचे सेवन अधूनमधून करावे. लोणच्याला रोजच्या आहाराचा भाग बनवू नका. परंतु दुसऱ्या प्रकारचे लोणचे आहे जे तुम्ही एक किंवा दोन वर्षांपूर्वी बनवले आहे. खाणे टाळावे. शक्यतो खाण्यासाठी नेहमी नवीन लोणचे बनवा. लोणचे ज्या ऋतूत बनवले जातात त्याच ऋतूत खा. त्याला दीर्घकाळ साठवून ठेऊ नका.''