Health Tips In Marathi: बदलत्या हवामानामुळे आणि जीवनशैलीमुळे लोकांमध्ये अनेक वेगवेगळे आजार होताना पाहायला मिळतात. अनेकांना सकाळी उठल्यानंतर अचानक भूक लागत असल्याचे दिसून आले आहे. अशावेळी रात्री आपण काहीच खाल्ले नाही, असे वाटते. रात्री पोटभर जेवूनही दुसऱ्या दिवशी उठल्यावर खूप भूक लागते, असे का होते? या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांना वाटते की, ही एक सामान्य समस्या आहे. परंतु, खरंच ही समस्या सामान्य आहे का? ही समस्या कशामुळे उद्भवते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.
नेहमी सकाळी उठल्यानंतर भूक लागण्याची ही समस्या कायम राहिल्यास, सकाळी पोट रिकामे राहिल्यासारखेच वाटते. यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. ही समस्या तुमच्या रक्तातील साखरेची पातळी आणि हार्मोन्समधील चढउतारांमुळे निर्माण होते.
जेव्हा तुम्ही रात्रीचे जेवण करून झोपता, तेव्हा तुमच्या रक्तातील साखर झपाट्याने वाढू लागते. परंतु, काही काळानंतर, जसे अन्न पचन होते, तशी रक्तातील साखर कमी होऊ लागते. जेव्हा शरीरातील साखरेची पातळी कमी होते, तेव्हा तुम्हाला भूक लागते. जर, तुम्ही तुमच्या आहारात जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यास तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि त्यामुळे तुम्हाला तीव्र भूक आणि तहान लागते. सकाळी उठल्या उठल्या भूक लागणे ही समस्या मधुमेहाशी संबंधित आहे.
रात्रीच्या जेवणानंतर स्वादुपिंडात अधिक इन्सुलिन तयार होऊ लागते. अतिरिक्त इन्सुलिन रक्तातील साखर कमी करते. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात डिहायड्रेशन होते. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर किमान २ ग्लास पाणी प्यावे.
सकाळी उठल्यानंतर भूक लागू नये म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवा. सर्व प्रथम, कधीही रात्री उशिरा अन्न खाऊ नका. त्यामुळे रात्रीचे जेवण वेळेवर, झोपण्याच्या किमान २ तास आधी खावे. यामुळे ते वेळेवर पचते आणि सकाळी उठल्यानंतर भूकेची समस्या उद्भवणार नाही. दररोज जेवल्यानंतर किमान १५ मिनिटे चाला. चालल्याने अन्न सहज पचते. यासोबतच पचनक्रियाही चांगली राहते आणि त्यासंबंधी कोणतीही समस्या येत नाही.
संबंधित बातम्या