Navratri Health Tips: नवरात्रीत ९ दिवस उपवास करताय? या टिप्स फॉलो केल्यास बिघडणार नाही तब्येत
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Navratri Health Tips: नवरात्रीत ९ दिवस उपवास करताय? या टिप्स फॉलो केल्यास बिघडणार नाही तब्येत

Navratri Health Tips: नवरात्रीत ९ दिवस उपवास करताय? या टिप्स फॉलो केल्यास बिघडणार नाही तब्येत

Published Oct 17, 2023 01:26 PM IST

Sharadiya Navratri 2023: बरेच लोक नवरात्रीत पूर्ण नऊ दिवस उपवास करतात. जर तुम्हीही ९ दिवस उपवास करत असाल तर तुम्ही या काही हेल्थ टिप्स फॉलो केल्या पाहिजे. जाणून घ्या उपवासात आरोग्याची काळजी कशी घ्यावी.

नवरात्री उपवासदरम्यान आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स
नवरात्री उपवासदरम्यान आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स (unsplash)

Fasting Tips to Stay Fit During Navratri: जरी काही अहवालांमध्ये असे मानले जाते की उपवास करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतु जर ते योग्यरित्या केले गेले नाही तर ते आरोग्यास हानी पोहोचवू शकते. १५ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत काही लोक नऊ दिवस उपवास करतात. जर तुमचाही अशा लोकांच्या यादीत समावेश असेल तर तुम्ही काही टिप्स फॉलो केल्या पाहिजेत, जेणेकरून तुमची तब्येत बिघडणार नाही आणि आरोग्य चांगले राहील.

फायबर युक्त गोष्टी खा

उपवासाच्या वेळी बहुतेक लोकांना पोटाशी संबंधित समस्या उद्भवतात. विशेषत: लोकांना बद्धकोष्ठतेसारख्या समस्या होतात. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. फायबरयुक्त अन्नासोबत तुम्ही फळांचाही समावेश करू शकता.

स्वतःला हायड्रेटेड ठेवा

उपवासाच्या वेळी स्वतःला हायड्रेट ठेवणे सर्वात महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत पाण्याचे प्रमाण योग्य ठेवावे. तुम्ही वेळोवेळी लिंबूपाणी पिऊ शकता. असे केल्याने थकवा दूर होतो. पाण्याची बॉटल नेहमी सोबत ठेवण्याचा प्रयत्न करा आणि वेळोवेळी पाणी प्या.

संतुलित आहार घ्या

उपवासात बहुतेक लोक दिवसभर उपाशी राहतात. त्यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतो. तुम्हीही असे करत असाल तर ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. असे करण्यापेक्षा संतुलित आहार घ्यावा. उदाहरणार्थ सकाळी फळांपासून बनवलेला शेक प्या. मग दिवसा काही फराळाचे पदार्थ खा आणि संध्याकाळी सुद्धा फराळाचे पदार्थ खा. उपवासात खाल्ल्या जाणाऱ्या भाज्यांचा आहारात नक्की समावेश करा.

 

सुका मेवा खा

उपवासात जास्त गोष्टी खाण्याचे ऑप्शन नाही. अशा परिस्थितीत सुका मेवा खाण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ड्राय फ्रुट्स भाजून खाऊ शकता. तुम्ही सकाळी भिजवलेले ड्रायफ्रुट्सही खाऊ शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner