Health Tips: गरम पाणी पिल्याने वाढतो ब्लड प्रेशर? हाय बीपीच्या लोकांना माहितीच हव्या 'या' गोष्टी-health tips does drinking hot water increase blood pressure see fact ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Tips: गरम पाणी पिल्याने वाढतो ब्लड प्रेशर? हाय बीपीच्या लोकांना माहितीच हव्या 'या' गोष्टी

Health Tips: गरम पाणी पिल्याने वाढतो ब्लड प्रेशर? हाय बीपीच्या लोकांना माहितीच हव्या 'या' गोष्टी

Sep 26, 2024 12:13 PM IST

should bp people drink hot water or not: हिवाळ्याच्या दिवसांत बहुतांश लोक गरम पाणीच पितात. परंतु बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की, कोमट किंवा गरम पाणी पिण्याने लोकांचा रक्तदाब वाढू शकतो आणि असे केल्याने उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना नुकसान होऊ शकते.

drinking hot water increases bp
drinking hot water increases bp (Freepik)

Drinking hot water increases BP:  पावसाळा संपून आता लवकरच हिवाळ्याला सुरुवात होणार आहे. आणि येत्या काही आठवड्यांत तापमानात घसरण सुरू होईल. थंडीच्या वातावरणात, बहुतेक लोकांना निरोगी राहण्यासाठी कोमट पाणी पिणे आवडते. कोमट पाणी आपल्या घशाला आराम देते आणि हिवाळ्यात पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.

हिवाळ्याच्या दिवसांत बहुतांश लोक गरम पाणीच पितात. परंतु बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की, कोमट किंवा गरम पाणी पिण्याने लोकांचा रक्तदाब वाढू शकतो आणि असे केल्याने उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना नुकसान होऊ शकते. कोमट पाणी पिणे खरोखरच धोकादायक आहे का? याबाबतच आपण तज्ज्ञ काय सांगतात हे जाणून घेणार आहोत.

बदलत्या हवामानात कोमट पाणी प्यायल्याने घशाला आराम मिळतो. हिवाळ्यात, लोक सहसा थंड पाण्याऐवजी कोमट पाणी पिणे पसंत करतात. कोमट पाणी शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते आणि पचनक्रिया व्यवस्थित ठेवते. कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. सर्दी-खोकल्याचा त्रास असणाऱ्यांनी असे पाणी पिणे जास्त फायदेशीर असते.

याबाबत माहिती देत तज्ज्ञांनी सांगितले की, गरम पाणी प्यायल्याने रक्तदाबात कोणताही बदल होत नाही. उच्च रक्तदाबाचे रुग्णही कोमट किंवा गरम पाणी पिऊ शकतात. यामुळे त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. महत्वाची बाब म्हणजे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी प्रत्येक ऋतूमध्ये दररोज पुरेसे पाणी प्यावे. आपल्या शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही याची काळजी या रुग्णांनी घ्यावी.

तसेच अनेक संशोधनात असेही समोर आले आहे की, रोज कोमट पाणी प्यायल्याने गॅस आणि अपचनाची समस्या कमी होते. कोमट पाणी प्यायल्याने रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्याला फायदा होतो. कोमट पाणी हिवाळ्यात आपल्या स्नायूंना आराम देते आणि तणाव कमी करण्यास मदत करते.

कोमट पाण्याचे नियमित सेवन केल्याने एकूणच आरोग्यासाठी प्रचंड फायदे मिळू शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीला गरम पाणी प्यायल्यानंतर त्रास होत असेल तर साधे पाणी प्या आणि डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय-

-मिठाचे मर्यादित सेवन करा.

-संतुलित आहार घ्या.

-भरपूर पोटॅशियम घ्या.

-रक्तदाब तपासत राहा.

-मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

-व्यायाम आणि योगासने नियमित करा.

-दारू आणि धूम्रपान टाळा.

-तुमचा ताण कमी करा.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग