Never Ignore 6 Body Signs: आजारी पडण्यापूर्वी आपले शरीर अनेक प्रकारचे संकेत देत असतो. योग्य वेळी हे संकेत समजून घेतल्यास अनेक प्रकारचे आजार टाळता येतात. अनेकदा सकाळी उठल्यावर आपल्याला शरीरात अनेक प्रकारच्या समस्या जाणवतात. जे सामान्य नसून काही आजारांमुळे उद्भवत असतात. जर तुम्हालाही अशी ६ प्रकारची लक्षणे सकाळच्या वेळी जाणवत असतील, तर ते कोणते आजार आणि शारीरिक कमतरता दर्शवतात ते समजून घ्या.
जर तुम्हाला झोपेतून उठल्यानंतर घशात खाज येत असेल किंवा झोपेतून उठल्याबरोबर खोकला सुरू झाला असेल, तर ही टॉन्सिलिटिस किंवा ॲलर्जीची लक्षणे आहेत. त्यामुळे डॉक्टरांना अवश्य दाखवा.
जर तुम्हाला झोपेतून उठल्यानंतर बरे वाटत नसेल, काहीही करावेसे वाटत नसेल आणि फक्त बसावेसे वाटत असेल तर ते निद्रानाश, नैराश्य, व्हिटॅमिन डी3 ची कमतरता याचे लक्षण असू शकते. किंवा कधीकधी हार्मोनल संतुलन बिघडल्यामुळेही होते. अशा परिस्थितीत योग्य उपचार आणि प्राणायाम यांच्या मदतीने त्यावर नियंत्रण मिळवता येते.
जर तुम्ही रात्री पुरेशी झोप घेतल्यानंतर उठलात परंतु नंतर तीव्र किंवा सौम्य डोकेदुखी जाणवत असेल, तर ही तणावाची लक्षणे असू शकतात. याशिवाय सायनस इन्फेक्शन आणि काहीवेळा उच्च रक्तदाब अशी मोठी कारणे लपलेली असू शकतात.
जर सकाळी शरीरात वेदना होत असतील तर ते पोषक तत्वांची कमतरता दर्शवते. कधीकधी हे फायब्रोमायल्जिया असते. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीर खूप नाजूक वाटते आणि सांधे आणि स्नायूंमध्ये वेदना होतात.
तुम्हाला ऍसिड रिफ्लक्सचा त्रास होत असल्यास, सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमच्या तोंडात एखाद्या धातूसारखी किंवा विचित्र चव जाणवू शकते. काहीवेळा हे सायनसच्या संसर्गामुळे देखील होते. लोह आणि कॅल्शियम सप्लिमेंट्स जास्त प्रमाणात घेतल्यास तोंडाला विचित्र चव येऊ लागते.
जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर चक्कर येत असेल, तर ते हायपोटेन्शन किंवा ॲनिमियामुळे देखील होऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)