why not drink water after eating bananas: लहानपणापासून आपल्याला निरोगी राहण्यासाठी फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. फळांमध्ये केळी हे सर्वात जास्त शिफारस केलेले फळ आहे कारण त्यात अनेक पोषक घटक असतात, जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. म्हणूनच मोठ्या आजारांमध्येही केळीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
पण तुम्हीही केळी खाल्ल्यानंतर लगेच पाण्याचे सेवन करता का, पण तुम्हाला हे माहित आहे का, की यामुळे तुम्हाला आरोग्यविषयक अनेक मोठ्या समस्या उद्भवू शकतात, तर चला जाणून घेऊया तुम्ही केळी खाल्ल्यानंतर किती वेळात पाणी प्यावे.आणि केळी खाऊन पाणी पिल्याने नेमक्या कोणत्या समस्या उद्भवतात.
हेल्दी डाएटबाबत तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे. केळी खाल्यांनंतर पाणी प्यावे की नको याबाबत बोलतांना त्यांनी सांगितले की, केळी हे फायबर आणि नैसर्गिक साखरेने समृद्ध फळ आहे. त्यामुळे लगेच पाणी प्यायल्यानंतर तुमच्या पचनक्रियेमध्ये समस्या येऊ शकतात. त्यामुळेच केळी खाल्यांनंतर लगेच पाणी पिणे योग्य नाही.
तज्ज्ञांच्या मते, केळी पचायला थोडा वेळ लागतो. त्या काळात पाणी प्यायल्यास ही प्रक्रिया अधिक मंद होते. म्हणूनच जे लोक केळी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पितात, त्यांच्या पोटात गॅस तयार होतो. विशेषत: केळीसोबत थंड पाणी मिसळल्याने ॲसिडिटी आणि गॅस्ट्रिक समस्या वाढू शकतात. ज्यामुळे पोटात जळजळ आणि अस्वस्थता वाटू लागते. याशिवाय केळी हे निसर्गातील एक थंड फळ आहे, ते खाल्ल्यानंतर जे लोक लगेच पाणी पितात, त्यांच्या शरीराचे तापमान अचानक बदलते, ज्यामुळे शरीरातील पचनक्रियेवर परिणाम होतो आणि त्यामुळे सर्दी किंवा इतर आरोग्य समस्या निर्माण होतात.
तज्ज्ञांनी सांगितले की, केळी खाल्ल्यानंतर आपण सर्वांनी ३०ते ४५ मिनिटांच्या अंतराने पाणी प्यावे, जेणेकरून पचनक्रिया पूर्ण होण्यास वेळ मिळेल आणि केळीचे पचन व्यवस्थित होईल. त्यामुळे तुम्हाला वरील उद्भवणार नाहीत.
केळी कधी खावी, जेवणापूर्वी की नंतर?
याबाबत बोलताना तज्ज्ञ सांगतात की, केळी गोड नसून किंचित तुरट असतात. सर्व फळे जेवण करण्यापूर्वी खाल्ले जातात. पण केळी हे एकमेव फळ आहे जे जेवणानंतर खावे. जेवणानंतर दोन केळी खाल्ल्यास ॲसिडिटीची समस्या कायमची दूर होईल. त्यामुळे केळी जेवणानंतर खाण्याला प्राधान्य द्या.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)