Health Tips: ग्रीन टीची चव आवडत नाही का? या गोष्टी मिसळून प्या, आरोग्यासाठी आहे फायदेशीर-health tips add these things in green tea to improve taste and increase health benefits ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Tips: ग्रीन टीची चव आवडत नाही का? या गोष्टी मिसळून प्या, आरोग्यासाठी आहे फायदेशीर

Health Tips: ग्रीन टीची चव आवडत नाही का? या गोष्टी मिसळून प्या, आरोग्यासाठी आहे फायदेशीर

Sep 23, 2024 07:01 PM IST

Green Tea: ग्रीन टीच्या चवीमुळे जर तुम्हाला प्यायचे नसेल तर त्यात या ३ गोष्टी घाला, ज्यामुळे चव वाढेल तसेच ग्रीन टीचे फायदे देखील वाढतील.

Health Tips:  ग्रीन टीमध्ये कोणत्या गोष्टी मिसळून पिता येतात
Health Tips: ग्रीन टीमध्ये कोणत्या गोष्टी मिसळून पिता येतात (pexels)

Things to Add in Green Tea: ग्रीन टीचे फायदे सर्वांनाच माहित आहेत, परंतु त्याच्या तुरट चवीमुळे बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. निरोगी राहण्यासाठी, विशेषत: चयापचय क्रिया सुधारण्यासाठी ग्रीन टी प्यायची असेल तर त्यात या ३ गोष्टी मिसळून प्या. यामुळे ग्रीन टीची चव सुधारण्यास मदत तर होईलच शिवाय आरोग्यासाठी ग्रीन टीचे फायदे दुप्पट होतील. अनेक फ्लेवरची ग्रीन टी बाजारात उपलब्ध असली तरी नैसर्गिकरित्या बनवलेली ग्रीन टी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. जाणून घ्या कोणत्या गोष्टीमुळे ग्रीन टीची चव योग्य होईल.

ग्रीन टीमध्ये मिसळा अॅपल सायडर व्हिनेगर

अॅपल साइडर व्हिनेगरची चव थोडी आंबट-गोड असते. हे ग्रीन टीमध्ये घातल्यास ग्रीन टीचा तुरटपणा कमी होण्यास मदत होते. फक्त एक कप ग्रीन टीमध्ये एक चमचा अॅपल साइडर व्हिनेगर घाला आणि प्या. हे केवळ टेस्ट वाढवत नाही तर वजन कमी करण्याची प्रक्रिया देखील सुलभ करते. खरं तर, बहुतेक लोक वजन कमी करण्यासाठी अॅपल साइडर व्हिनेगर पितात.

ग्रीन टीमध्ये मिसळा लिंबू

ग्रीन टीची चव वाढवण्यासाठी बरेच लोक लिंबाचा रस घालतात. यामुळे चव वाढते तसेच आरोग्याला ही फायदा होतो. लिंबाचा रस ग्रीन टीचे अँटीऑक्सिडंट्स वाढवतो. ज्यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो. यामुळे वजन लवकर कमी होण्यास मदत होते.

ग्रीन टीमध्ये मिसळा लाल द्राक्षे

बाजारात लाल द्राक्षे सहज उपलब्ध होतात. ग्रीन टी बनवताना एक द्राक्ष पाण्यात उकळून मग त्यात ग्रीन टी घाला. यामुळे द्राक्षांचा गोडवा आणि चव पाण्यात विरघळणार. शिवाय ग्रीन टीचा तुरटपणाही कमी होईल. याशिवाय ग्रीन टी देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग