Guillain Barre Syndrome म्हणजे काय? तज्ञांकडून जाणून घ्या या दुर्मिळ आजाराविषयी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Guillain Barre Syndrome म्हणजे काय? तज्ञांकडून जाणून घ्या या दुर्मिळ आजाराविषयी

Guillain Barre Syndrome म्हणजे काय? तज्ञांकडून जाणून घ्या या दुर्मिळ आजाराविषयी

Feb 22, 2024 08:47 PM IST

Health Care Tips: गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. जाणून घ्या याची लक्षणे, उपचार विषयी सविस्तर.

गुइलेन बॅरे सिंड्रोमची लक्षणे आणि उपचार
गुइलेन बॅरे सिंड्रोमची लक्षणे आणि उपचार (freepik)

Guillain Barre Syndrome: गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मज्जातंतूंवर हल्ला करते. या स्थितीचा परिणाम स्नायूंमधील कमकुवतपणा, पक्षाघात आणि गंभीर प्रकरणांमध्ये जीवघेणी गुंतागुंत होऊ शकते. दुर्मिळ असा गुइलेन बॅरे सिंड्रोम कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना प्रभावित करू शकते. गुइलेन बॅरे सिंड्रोमची कारणे पूर्णपणे समजून घेणे वैद्यकीय शास्त्रासाठी अजूनही एक आव्हान आहे. गुइलेन बॅरे सिंड्रोमला ऑटोइम्यून डिसऑर्डर म्हणतात. गुइलेन बॅरे सिंड्रोमचे (GBS) नेमके कारण ज्ञात नसून रीजनरेटिव्ह मेडिसिन एक्स्पर्ट आणि स्टेमआरक्स बायोसायन्स सोल्यूशन्स इंडियाचे संस्थापक डॉ प्रदीप महाजन यांनी केलेल्या संशोधनाद्वारे जीबीएसच्या विकासास कारणीभूत असलेल्या घटकांवर प्रकाश टाकणे, अचूक निदान आणि उपचार करणे हे याविषयी स्पष्ट केले आहे.

प्रभावी हस्तक्षेपासाठी गुइलेन बॅरे सिंड्रोमचे वेळीच निदान महत्त्वाचे आहे. मुंग्या येणे, स्नायू कमकुवत होणे आणि डोळे किंवा चेहऱ्याची हलचाल करण्यास त्रास होणे यासारख्या लक्षणांबद्दल जागरूकता वाढविणे गरजेचे आहे. मज्जातंतू हळूहळू निकामी करून या आजाराचा विषाणू बोटं, पाय, हात, फुफ्फुसं आणि श्वसननलिकेवरही हल्ला चढवतो. अशावेळी रूग्णांची अवस्था पक्षाघात म्हणजे लकवा आल्यासारखी होते.

ही आहेत लक्षणे

- अंग दुखणे

- चालताना तोल जाणे

- चेहरा सुजणे

- चावताना व गिळताना त्रास होणे

- हात व पाय लुळे पडणे

हे आहेत प्रगत उपचार पर्याय

गुइलेन बॅरे सिंड्रोमसाठी नवीन उपचार पद्धती उपलब्ध आहेत. इम्युनोग्लोब्युलिन थेरपीपासून प्लाझ्मा थेरेपीपर्यंत उपचार करता येतात, जी रुग्णाच्या गरजांनुसार दिली जातात. नवीन वैद्यकीय प्रगतीमुळे रुग्णास सर्वात प्रभावी उपचार मिळू शकतात. या आजारात रक्तदाबाच्या समस्येपासून ते श्वास घेण्यास त्रास होण्यापर्यंतच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. गुइलेन बॅरे सिंड्रोम एक वेगाने प्रगतीशील पॉलीन्युरोपॅथी आहे, ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात. संशयास्पद रुग्णांसाठी इलेक्ट्रोमायोग्राफी आणि CSF विश्लेषण यासारख्या इलेक्ट्रोडायग्नोस्टिक टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो.

शिक्षणाद्वारे रुग्णांचे सक्षमीकरण

सेमिनार, वेबिनार आणि माहितीपूर्ण साहित्याद्वारे, जीबीएस आणि त्याचे जोखीम घटक आणि वेळीच निदान व उपचाराचे महत्त्व याविषयीचे ज्ञान असलेल्या व्यक्तींना सक्षम करणे ही काळाची गरज आहे. गुइलेन बॅरे सिंड्रोम हा दुर्मिळ असला तरी प्रगत उपचार पद्धतीद्वारे प्रभावी उपचाराने रुग्णांना दिलासा मिळू शकतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner