Dengue Recovery: डेंग्यू तापातून बरे होण्यासाठी खायला द्या 'या' गोष्टी, काही दिवसात होईल फिट-health care tips know what to eat for recovery from dengue fever ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dengue Recovery: डेंग्यू तापातून बरे होण्यासाठी खायला द्या 'या' गोष्टी, काही दिवसात होईल फिट

Dengue Recovery: डेंग्यू तापातून बरे होण्यासाठी खायला द्या 'या' गोष्टी, काही दिवसात होईल फिट

Sep 22, 2024 01:24 PM IST

Health Care Tips: डेंग्यूच्या तापातून बरे झाल्यानंतरही काही लोकांना अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. अशावेळी पूर्वीप्रमाणे फिट राहण्यासाठी आहारात सुधारणा करायला हवी. येथे जाणून घ्या कोणत्या गोष्टी खाव्यात

Dengue Recovery डेंग्यू तापातून बरे होण्यासाठी काय खावे
Dengue Recovery डेंग्यू तापातून बरे होण्यासाठी काय खावे

Foods for Recovery From Dengue Fever: डेंग्यूच्या तापामुळे दरवर्षी अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. पावसाळ्यात येणारा हा सर्वात सामान्य ताप आहे. मादी इजिप्ती एडिस नावाच्या डासांच्या चाव्यामुळे हा आजार होतो. पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी भरते. ज्यामुळे या डासांची वाढ होते. डेंग्यूमुळे रुग्णाच्या शरीरात अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. तर काही लोकांना बरे झाल्यानंतरही अशक्तपणा जाणवतो. योग्य रिकव्हरी न झाल्यामुळे हे घडते. डेंग्यू तापातून लवकर बरे व्हायचे असेल तर जेवणात काही गोष्टींचा समावेश करा.

ब्रोकोली

ब्रोकोली आरोग्यासाठी खूप चांगली असते. यात असलेले गुणधर्म रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढविण्यास मदत करतात. डेंग्यूनंतर स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी ब्रोकोलीचा आहारात समावेश करा. हे वाफवूनही खाऊ शकता.

व्हिटॅमिन सी समृद्ध फळे

संत्री, पपई, पेरू आणि स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. रोजच्या रूटीनमध्ये मोसंबी, आवळा, करवंद, लिंबू यांचा समावेश करा.

लसूण आणि आले

या दोन्हीमध्ये अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक कार्य वाढू शकते. आपल्या जेवणात या दोन्ही गोष्टींचा समावेश करा.

प्रथिनेयुक्त पदार्थ खा

पनीर, दही, दूध, सोया, डाळ, राजमा, चणे, हरभरा, चेन्ना, सहजन, सत्तू, टोफू, डाळी, बीन्स यांचा आहारात समावेश करा. या सर्व गोष्टींमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात.

बीटरूट आणि गाजर

डेंग्यू तापामध्ये प्लेटलेट्स कमी होतात. अशावेळी जेवणात बीटरूट आणि गाजराचा समावेश करा. या दोन्ही गोष्टी अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वांनी समृद्ध आहेत, ज्या रक्त पेशींच्या पुनरुत्पादनास आणि प्लेटलेटची संख्या सुधारण्यास मदत करतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग