Health Benefits of Papaya Leaf Juice: पपईचे फळ आरोग्यासाठी वरदान मानले जाते. यामध्ये असणारे नॅचरल लॅक्सेटिव्ह बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करतात. रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने बाउल मूव्हमेंट सुधारते आणि ब्लोटिंगची समस्या होत नाही. या फळाची विशेषता म्हणजे फक्त हे फळच नाही तर याची पानं देखील आरोग्याला जादुई फायदे देतात. पपईच्या पानांकडे आयुर्वेदात औषध म्हणून पाहिले जाते. पपईच्या पानांमध्ये फायबर, प्रथिने, कार्बोहायड्रेट, फोलेट, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असते. फायबरयुक्त पपईच्या पानांचा रस प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते, पचनक्रिया मजबूत होते आणि रक्त स्वच्छ होते. इतकंच नाही तर डेंग्यू तापामध्ये अनेकदा रुग्णांच्या प्लेटलेट्स कमी होतात. अशा वेळी पपईच्या पानांचा रस प्यायल्याने रुग्णाच्या प्लेटलेट्स लवकर रिकव्हर होण्यास मदत होते.
पपईच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी सारख्या पोषक तत्वांसह इम्युनोमोड्यूलेटरी प्रभाव देखील असतो. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत होते. पपईच्या पानांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि अल्कलॉइडसह अनेक अँटीवायरल गुणधर्म देखील असतात जे शरीराला व्हायरल इन्फेक्शनशी लढण्यास मदत करतात, असे न्यूट्रिशनिस्ट आणि वेलनेस एक्सपर्ट वरुण कत्याल सांगतात.
पपईच्या पानांमध्ये पपेन आणि फायबर सारखे पोषक घटक असतात, जे पचन योग्य ठेवून गॅस, ब्लोटिंग आणि अपचन यासारख्या समस्या दूर करण्यास मदत करतात. फायबर आतड्यांसाठी फायदेशीर आहे आणि पपेन प्रोटीनच्या ब्रेकडाउनध्ये मदत करते.
पपईच्या पानांमध्ये असलेले व्हिटॅमिन ए, सी आणि ई रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतात. या पानांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.
पपईच्या पानांचे सेवन केल्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. ते स्वादुपिंडातील इन्सुलिन-उत्पादक पेशींचे संरक्षण करून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात.
पपईचा रस प्यायल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई सारखे गुणधर्म वृद्धत्वाची समस्या दूर करून सुरकुत्यांशी लढण्यास मदत करतात.
डेंग्यू झालेल्या व्यक्तीचे प्लेटलेट्स कमी होऊ लागतात. ज्यामुळे काही वेळा व्यक्तीच्या जीवाला धोकाही वाढतो. अशा वेळी पपईची पाने प्लेटलेट्स वाढवून लवकर रिकव्हर होण्यास मदत करतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या