Tips to Detox Body: रक्षाबंधनाचा सण भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या खास प्रसंगी लोकांच्या घरी भरपूर गोड पदार्थ बनवले जातात, तर काही पदार्थ असेही बनवले जातात जे डीप फ्राय केलेले असतात. सणासुदीच्या निमित्ताने फिटनेस फ्रीक लोकही आरोग्याची चिंता न करता भरपूर खातात. या गोष्टी खाल्ल्यानंतर मन पूर्णपणे प्रसन्न आणि समाधानी होते, पण पोट बिघडते. रक्षाबंधनाला तुम्हीही भरपूर मिठाई आणि तळलेले, मसालेदार पदार्थ खाल्ली असेल तर आता शरीराला डिटॉक्स करण्याची वेळ आली आहे. असे केल्याने शरीरातून हानिकारक विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि मग आजारांचा धोका कमी होतो.
जर तुम्ही सणासुदीला भरपूर मिठाई खाल्ली असेल आणि तळलेले पदार्थही खाल्ले असतील तर शरीर फिट ठेवण्यासाठी डिटॉक्स करा. यासाठी कार्डिओ एक्सरसाइज आणि वॉक करा. या दोन्ही गोष्टी शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात. बॉडी डिटॉक्सिफिकेशनसाठी दररोज २० ते ३० मिनिटे कार्डिओ व्यायाम करा. कार्डिओ करण्याची इच्छा नसेल तर वॉक करा.
डिटॉक्स वॉटर पिणे डिटॉक्सिफिकेशनसाठी चांगले मानले जाते. हे घरी सहज बनवू शकतो. काकडी पुदिन्यापासून बनवलेले हे पाणी खूप फायदेशीर मानले जाते. हे बनविण्यासाठी पाण्याच्या बाटलीत काकडी आणि पुदिन्याच्या पानांचे काही तुकडे घाला. हे पाणी रात्रभर ठेवा आणि सकाळी हे पाणी प्या. हवं असेल तर सकाळी बनवा आणि मग दिवसभर प्या. हे शरीराला डिटॉक्स करेल आणि पचन सुधारेल.
शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी उपवास उत्तम आहे. यासाठी किमान दोन वेळच्या जेवणात अंतर ठेवणे फायदेशीर ठरू शकते. यासाठी आठवड्यातून एकदा इंटरमिटेंट फास्टिंग सुद्धा करता येते.
शरीराला डिटॉक्स करण्यासाठी कोमट पाणी प्या. आपण शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. तसेच हे शरीराच्या सर्व भागांसाठी चांगले मानले जाते. हे पाणी तुम्ही सकाळी पिऊ शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)