Detox Drinks: शरीर डिटॉक्स करण्यासाठी प्या 'हे' ड्रिंक्स, शरीराचे अनेक भाग होतील स्वच्छ
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Detox Drinks: शरीर डिटॉक्स करण्यासाठी प्या 'हे' ड्रिंक्स, शरीराचे अनेक भाग होतील स्वच्छ

Detox Drinks: शरीर डिटॉक्स करण्यासाठी प्या 'हे' ड्रिंक्स, शरीराचे अनेक भाग होतील स्वच्छ

Published Aug 08, 2024 08:40 PM IST

Health Care Tips: आपल्या शरीरास डिटॉक्सिफाय करण्यासाठी काही ड्रिंक्स मदत करतात. जाणून घ्या हे डिटॉक्स ड्रिंक्स कसे बनवायचे.

शरीर डिटॉक्स करणारे ड्रिंक्स
शरीर डिटॉक्स करणारे ड्रिंक्स (unsplash)

Drinks to Detox Body: फिट राहण्यासाठी हेल्दी खाणे गरजेचे आहे. यासोबतच शरीराला डिटॉक्स सुद्धा केले पाहिजे. शरीरातील अनेक गंभीर आजार टाळण्यासाठी शरीराला डिटॉक्स करणं गरजेचं आहे. बॉडी डिटॉक्स करणे म्हणजे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणे. असे केल्याने शरीराचे अवयव स्वच्छ होऊ शकतात. येथे ४ प्रकारचे डिटॉक्स ड्रिंक्स घरी कसे बनवायचे ते सांगत आहोत. जाणून घ्या.

डिटॉक्स ड्रिंक्स कसे बनवावे

तुम्ही घरी ४ प्रकारे डिटॉक्स वॉटर तयार करू शकता. हे बनविणे अगदी सोपे आहे. फक्त नमूद केलेले घटक बॉटलमध्ये घाला आणि नंतर २ ते ४ तास ठेवल्यानंतर प्या.

१. लिंबू आणि पुदिन्याचे पाणी

हे एक पेय आहे जे आपले पचन सुधारते. याशिवाय हे पेय रोगप्रतिकारक शक्तीसाठी सुद्धा उत्तम आहे. हे बनविण्यासाठी तुम्हाला लिंबू आणि ताजी पुदिना पाने आवश्यक आहे. हे बनवण्यासाठी लिंबाचे पातळ तुकडे करून पुदिन्याची पाने तोडून घ्या. हे फक्त पाण्यात टाका आणि थोडा वेळ राहू द्या.

२. लिंबू आणि आल्याचे पाणी

हे ड्रिंक सुद्धा पचनासाठी चांगले आहे. ज्या लोकांना पचनाशी संबंधित समस्या आहेत ते हे ड्रिंक पिऊ शकतात. याशिवाय इन्फ्लेमेटरी प्रॉब्लेम्सचा सामना करण्यासाठीही हा एक चांगला पर्याय आहे. ते बनवण्यासाठी आलं आणि लिंबू धुवून घ्या. नंतर आले सोलून घ्या. आले आणि लिंबाचे पातळ तुकडे करून पाण्यात घाला.

३. सफरचंद आणि दालचिनीचे पाणी

चयापचय वाढवण्यासाठी हे खूप चांगले पाणी आहे. ते प्यायल्याने रक्तातील साखरेच्या नियमनात मदत होईल. ते तयार करण्यासाठी आधी सफरचंद धुवून घ्या आणि नंतर बारीक चिरून घ्या. आता ते पाण्यात टाका आणि त्यात दालचिनीचा १ मोठा तुकडा घाला.

४. काकडीचे पाणी

पावसाळ्यात काकडीचे पाणी प्यावे. हे प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते. याशिवाय त्वचेच्या आरोग्यासाठीही हे चांगले मानले जाते. हे बनवण्यासाठी काकडी धुवून नंतर बारीक कापून पाण्यात टाका.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner