Heartburn Remedy: छातीत जळजळ आणि ॲसिडिटी झाल्यास अँटासिडची गोळी नाही तर खा हे फळ, लगेच मिळेल आराम
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Heartburn Remedy: छातीत जळजळ आणि ॲसिडिटी झाल्यास अँटासिडची गोळी नाही तर खा हे फळ, लगेच मिळेल आराम

Heartburn Remedy: छातीत जळजळ आणि ॲसिडिटी झाल्यास अँटासिडची गोळी नाही तर खा हे फळ, लगेच मिळेल आराम

Jul 29, 2024 03:25 PM IST

Health Care Tips: जेवण केल्यानंतर छातीत जळजळ आणि ॲसिडिटी वाढू लागली तर अन्ननलिकेतील ॲसिड रिफ्लक्समुळे ही समस्या उद्भवते. अशा वेळी हे फळ तुम्हाला मदत करू शकतं.

हार्टबर्नपासून आराम मिळवण्यासाठी उपाय
हार्टबर्नपासून आराम मिळवण्यासाठी उपाय (unspalsh)

How to Get Rid of Heartburn: छातीत जळजळ आणि ॲसिडिटीची समस्या अनेकांसाठी त्रासदायक असते. छातीत जळजळ होताच लोक अँटासिडच्या गोळ्या खातात. जेणेकरून त्यांना लगेच आराम मिळेल. परंतु हे अँटासिड आपल्या पोटात असलेले नैसर्गिक आम्ल काढून टाकण्यास सुरवात करतात. ज्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस वाढतच जाते. जर तुम्हाला छातीत जळजळ होण्याचा आणि ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर ताबडतोब हे फळ खा. हे फळ छातीतील जळजळ दूर करण्यास मदत करेल.

हार्टबर्नचे लक्षण

हार्टबर्न झाल्यामुळे बऱ्याचदा छातीत तीव्र जळजळ होते. ज्याचे कारण एसोफेगस म्हणजे अन्न नलिकेतील ॲसिड रिफ्लक्स हे असते. छातीत जळजळ होण्याची समस्या घसा आणि छाती दोन्हीमध्ये देखील उद्भवू शकते.

झोपल्यावर ही समस्या वाढते

जेवण करून थेट झोपले किंवा रात्रीचे जेवण उशीरा केले, मसालेदार पदार्थ खाल्ले तर पोटाला ते पचत नाही. ज्यामुळे छातीत जळजळ होते.

केळी खाल्ल्याने मिळेल आराम

छातीत जळजळ होण्याची समस्या असेल तर केळी खा. केळीमध्ये नैसर्गिक अँटासिड आणि पोटॅशियम असते. जे पोटातील आम्ल निष्प्रभ करण्यास मदत करतात. ज्यामुळे एसोफेगसची लाइनिंग म्हणजेच अन्ननलिकेचे अस्तर रिलॅक्स होते. तथापि, हे तात्पुरते आरामदायक आहे.

केळीमुळे हार्टपासून आराम मिळतो का?

केळी खाल्ल्याने हार्टबर्न म्हणजे छातीत जळजळ होत असताना प्रत्येकाला आराम मिळतोच असे नाही. यासाठी पिकलेली केळी संतुलित आहारात खाणे गरजेचे आहे.

लिंबामुळे दूर होईल हार्टबर्नची समस्या

जास्त जेवण केल्याने किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्याने छातीत जळजळ होण्याची समस्या उद्भवत असेल तर पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने देखील आराम मिळतो. ॲसिटिक ॲसिडने समृद्ध लिंबू छातीत जळजळ होण्याची समस्या कमी करते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner