Health Benefits Of Various Types Of Salts: भोजनाची चव वाढवण्यासाठी मीठ प्रत्येक खाद्यपदार्थात वापरले जाते. मीठ नसलेले पदार्थ बेचव आणि अळणी बनतात. शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी सोडियमदेखील आवश्यक असते. जे फक्त योग्य प्रमाणात मीठ खाल्ल्याने मिळते. त्यामुळेच डॉक्टर एखाद्या व्यक्तीला चांगल्या आरोग्यासाठी मर्यादित प्रमाणात मीठ खाण्याचा सल्ला देतात. अशा परिस्थितीत कोणते मीठ तुमच्या आरोग्यासाठी अधिक उपयुक्त आहे. हे आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी मीठाचे किती प्रकार आहेत आणि कोणते मीठ खाल्ल्याने माणसाला काय फायदे होतात हेही जाणून घेऊया.
आयुर्वेदानुसार रॉक सॉल्ट अर्थातच सैंधव मीठ इतर क्षारांपेक्षा उत्तम मानले जाते. हे मीठ उपवासातही सेवन केले जाते. या मिठाचे वैशिष्ट्य म्हणजे ते पांढऱ्या आणि काळ्या मिठापेक्षा ८४ पट अधिक चांगले आहे. कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, जस्त, तांबे, सेलेनियम अशी अनेक खनिजे या मीठात असतात. जे छातीत जळजळ, सूज येणे, पचन समस्या आणि बद्धकोष्ठता सुधारण्यास मदत करतात.
समुद्री मीठ हे समुद्राच्या पाण्यापासून बनवले जाते. त्यात असलेल्या मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम या खनिजांमुळे ते रॉक मिठापेक्षाही अधिक महाग आहे. या मिठात असलेले कॅल्शियम दात आणि हाडांचा कमकुवतपणापासून बचाव करतात. त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे. परंतु समुद्री मीठ मर्यादित प्रमाणात सेवन करावे अन्यथा उच्च रक्तदाब होऊ शकतो.
या मीठात नावाप्रमाणेच आयोडीन मुबलक प्रमाणात असल्याने थायरॉईड ग्रंथीसाठीही ते खूप फायदेशीर आहे. या प्रकारचे मीठ घरांमध्ये सर्वाधिक वापरले जाते. परंतु ते देखील मर्यादित प्रमाणात वापरावे. आयोडीनयुक्त मीठ खाल्ल्याने तणाव कमी होतो आणि मेंदूसोबतच केस, नखे, दात आणि त्वचेच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाते.
काळ्या मीठाची रासायनिक रचना सोडियम क्लोराईड अशी आहे. यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असल्याने पोटाच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. याच्या नियमित सेवनाने गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या पाचक समस्यांपासून आराम मिळतो. याशिवाय काळे मीठ वजन कमी करण्यास, बीपी नियंत्रित करण्यास, छातीत जळजळ कमी करण्यास आणि स्नायूंच्या क्रॅम्पपासून आराम देण्यास मदत करते.
गुलाबी मीठ हिमालयातून मिळते. ज्यामध्ये अनेक प्रकारची खनिजे असतात. हे मीठ थोडे गोड लागते. या मीठाचे नियमित आणि मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. अन्न किंवा पेयांमध्ये गुलाबी मीठ टाकल्याने शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राखण्यास मदत होते. ज्यामुळे डिहायड्रेशनपासून बचाव होतो. गुलाबी हिमालयीन मीठ तुमच्या मेंदूतील सेरोटोनिन हार्मोन वाढवून तणाव कमी करते. कमी तणावामुळे तुम्हाला चांगली झोप लागते. इतकेच नाही तर हिमालयीन गुलाबी मीठ तुमची त्वचा स्वच्छ करण्यातही मदत करते.
संबंधित बातम्या