Health Tips: बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी 'हा' चहा असतो अत्यंत उपयुक्त! फायदे वाचून बसणार नाही विश्वास
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Tips: बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी 'हा' चहा असतो अत्यंत उपयुक्त! फायदे वाचून बसणार नाही विश्वास

Health Tips: बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी 'हा' चहा असतो अत्यंत उपयुक्त! फायदे वाचून बसणार नाही विश्वास

Published Aug 03, 2024 09:12 AM IST

Health Benefits Of Lotus Flower Tea: अलीकडे बहुतांश लोक त्यांच्या आवडत्या चहावर प्रयोग करत राहतात. चहासुद्धा पिता यावा आणि त्याचे फायदेही मिळावेत अशी यामागची खास अपेक्षा असते.

lotus flower tea benefits
lotus flower tea benefits (shutterstock)

Health Benefits Of Lotus Flower Tea: सकाळची नवी सुरुवात करण्यासाठी आणि दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी जर, तुम्हाला एक कप चहा हवा असेल. तर ही बातमी खास तुमच्यासारख्या चहाप्रेमींसाठी आहे. होय, बदलत्या काळानुसार दुधाच्या चहाच्या जागी ग्रीन टी, ब्लॅक टी असे चहाचे विविध प्रकार पाहायला मिळतात. अलीकडे बहुतांश लोक त्यांच्या आवडत्या चहावर प्रयोग करत राहतात. चहासुद्धा पिता यावा आणि त्याचे फायदेही मिळावेत अशी यामागची खास अपेक्षा असते.

अशाच एका आरोग्यदायी प्रयोगाचा परिणाम म्हणजे कमळाच्या फुलांचा चहा अर्थातच ज्याला आपण लोटस टी म्हणतो. आयुर्वेदानुसार पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस आणि क्लोरीन यांसारखी अनेक प्रकारची खनिजे कमळाच्या फुलांमध्ये असतात. शिवाय यामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मही आढळतात. इतकेच नाही तर, कमळाची फुले कार्बोहायड्रेट्स आणि फायबरचा निरोगी स्रोत आहे.

कमळाच्या फुलांना आयुर्वेदात सर्वोत्तम औषधीय फुल मानले जाते. कमळाच्या फुलांपासून बनवलेला चहा प्यायल्याने व्यक्तीला ताप, डोकेदुखी आणि जळजळ यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. आयुर्वेदिक तज्ज्ञ दीक्षा भावसार यांच्याकडून जाणून घेऊया कमळाच्या फुलांपासून बनवलेला चहा पिण्याचे काय फायदे आहेत आणि तो बनवण्याची योग्य पद्धत. आम्ही तुम्हाला सांगतो, दीक्षाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून कमळाच्या फुलांचा चहा अर्थातच लोटस टी पिण्याचे फायदे सांगितले आहेत.

रक्तदाब (बीपी) नियंत्रणात ठेवते

कमळाच्या फुलांपासून बनवलेला चहा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. हा चहा नियमित प्यायल्याने हाय बीपीची समस्या आटोक्यात राहते. पण तुम्हाला लो बीपी बद्दल काळजी वाटत असेल, तर तज्ञांच्या सल्ल्यानंतरच याचे सेवन करा.

तणावातून मुक्ती

कमळाच्या फुलातील अपोमॉर्फिन आणि न्यूसिफेरिन नावाचे पोषक तत्व तणाव, नैराश्य आणि चिंता यापासून मुक्त होण्यास मदत करतात. तज्ज्ञांच्या मते, कमळाच्या फुलांपासून बनवलेला चहा नियमितपणे प्यायल्याने मन शांत राहण्यास मदत होते.

मासिक पाळीच्या वेदनापासून आराम

ज्या महिलांना मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना होतात. प्रचंड अंग दुखते. त्यांच्यासाठीही कमळाच्या फुलांपासून बनवलेला चहा फायदेशीर ठरू शकतो. मासिक पाळी दरम्यान हा चहा रोज २ कप प्यायल्याने आराम मिळतो.

तहान नियंत्रणात ठेवते

ज्यांना जास्त तहान लागते त्यांच्यासाठी लोटस चहा खूप फायदेशीर आहे. कमळाच्या चहामध्ये असलेले पोषक तत्व तहान भागवण्यास मदत करतात. कमळाच्या फुलांचा चहा शरीराचे तापमान थंड ठेवण्यासही मदत करते. ज्यामुळे शरीरातील उष्णता आटोक्यात राहते.

लोटस टी बनवण्याची पद्धत

कमळाच्या फुलांपासून चहा बनवण्यासाठी प्रथम एका पातेल्यात एक ग्लास पाणी घेऊन ते उकळावे. आता या उकळत्या पाण्यात कमळाची फुले टाका आणि थोडा वेळ शिजवा. हे करत असताना पाणी आणि कमळाचे फुल यांचे गुणोत्तर ४:१ ठेवा. त्यानंतर हा चहा साधारण २ तास थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.पाण्याचे हे मिश्रण थंड झाल्यावर गाळणीच्या साहाय्याने गाळून त्यात थोडा गुलाबाचा अर्क टाका. तुमचा चविष्ट आणि आरोग्यदायी कमळाच्या फुलांचा चहा तयार आहे. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही या चहाची चव वाढवण्यासाठी मध वापरू शकता.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

Whats_app_banner