sesame seeds benefits during winter : हिवाळ्यात आपल्या खाण्यापिण्याची आणि एकूणच जीवनशैलीची थोडी जास्त काळजी घेण्याची गरज असते. या काळात सर्दी खोकल्यासारखे आजार देखील बळावतात. अशा रोगांपासून दूर राहण्यासाठी हिवाळ्यात लोक आपल्या आहारात काही खास गोष्टींचा समावेश करतात, ज्या त्यांना आजारांपासून दूर तर ठेवतातच पण आपल्या शरीराला आवश्यक पोषक तत्वं देण्याचं कामही करतात. त्यापैकीच एक म्हणजे पांढरे तीळ. हिवाळा येताच लोक आपल्या आहारात तिळाचा समावेश करू लागतात. मग ते दुधाबरोबर एक चमचा तीळ खाणे असो किंवा लाडू, चिक्की किंवा इतर मिठाईच्या माध्यमातून तिळाचे सेवन करणे असो. हिवाळ्यात तीळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. आज आपण या फायद्यांविषयी जाणून घेऊया...
हिवाळ्यात मोसमी आजारांपासून बचाव करण्यासाठी शरीर उबदार ठेवणे अत्यंत गरजेचे असते. अशा वेळी केवळ जाड कपडे घालून चालत नाही, तर शरीराला आतून उबदार ठेवणे गरजेचे असते. यासाठी तुम्ही आपल्या आहारात पांढऱ्या तिळाचा समावेश करू शकता. कारण तिळाचा प्रभाव उष्ण असतो. तिळाचे नियमित सेवन केल्याने शरीर आतून उबदार राहते. आपण दररोज दुधाबरोबर तिळाचे सेवन करू शकता किंवा गुळासह चवदार मिष्टान्न बनवून खाऊ शकता.
हिवाळ्यात किरकोळ आजार टाळण्यासाठी आपली रोगप्रतिकारशक्ती सुधारणे अत्यंत गरजेचे आहे. रोज पांढऱ्या तिळाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. खरं तर पांढऱ्या तिळात झिंक मुबलक प्रमाणात आढळतं, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतं. अशावेळी हिवाळ्यात पांढऱ्या तिळाचे सेवन केल्यास ते तुमच्या सर्वांगीण आरोग्यासाठी खूप चांगले असते.
पांढऱ्या तिळाचे नियमित सेवन आपल्या पोट आणि हृदय दोन्हीसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. खरं तर तिळात भरपूर प्रमाणात फायबर आढळतं, ज्यामुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. त्याचबरोबर पांढऱ्या तिळाचे नियमित सेवन शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्याचे काम करते, जे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे.
हिवाळ्यात शारीरिक हालचाली कमी होतात, तर भूक देखील खूप वाढते. यामुळे हिवाळ्यात अनेकदा लोकांचे वजन खूप वाढते. तुम्हालाही आपल्या वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर हिवाळ्यात पांढऱ्या तिळाचा आहारात समावेश करू शकता. तिळाचे सेवन केल्याने पोट बराच काळ भरलेले राहते, ज्यामुळे भूक नियंत्रित होण्यास मदत होते.
पांढरे तीळ आपल्या त्वचेसाठी आणि हाडांसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाहीत. थंड हवामानात थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे त्वचा अतिशय कोरडी व निस्तेज दिसते. अशावेळी तिळाचे दररोज सेवन केल्याने तुमची त्वचा निरोगी, चमकदार आणि आतून मॉइश्चरायझ राहण्यास मदत होते. त्याचबरोबर तिळात भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळते, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. जर तुमची पाठ आणि सांधे दुखत असतील, तर हिवाळ्यात तिळाचे सेवन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
संबंधित बातम्या