Health Benefits: आजही लोक जेवणासह आनंदाने हिरवी मिरची खातात. नेहमीच्या वापरात येणारी हिरव्या मिरचीचे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे बहुतेक लोकांना माहिती असेल. जेवणासोबत हिरवी मिरची खाल्ल्याने लठ्ठपणापासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत अनेक फायदे आहेत.
डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मिरची खाण्याचे अनेक फायदे आहेत. चीनमधील गुआंग्शी मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की, मिरची खाल्ल्यानंतर सुमारे २० टक्के लोकांनी हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येण्याची समस्या कमी झाल्याचे सांगितले आहे. सुमारे ५० हजार लोकांनी या टेस्टमध्ये सहभाग घेतला. त्यानुसार, मिरची लठ्ठपणा कमी करण्यासही मदत करू शकते. शिमला मिरची, लाल मिरची आणि हिरवी मिरची नियमित खाणाऱ्यांना हृदयविकारात आराम मिळतो आणि त्यांना रक्ताच्या गुठळ्या होण्याची समस्याही कमी होते. आठवड्यातून दोन-तीन दिवस मसालेदार पदार्थ खाणाऱ्यांनाही याचा फायदा होतो.
संबंधित बातम्या