मराठी बातम्या  /  Lifestyle  /  Health Beauty Summer Eid Akshay Tritiya Know Top Latest Trending 22 April News

Lifestyle Stories 22th April: अक्षय्य तृतीया ते ईदचे सेलिब्रेशन! वाचा आजच्या टॉप लाइफस्टाइल स्टोरीज

Lifestyle news in Marathi
Lifestyle news in Marathi (Freepik )
Tejashree Tanaji Gaikwad • HT Marathi
Apr 22, 2023 07:52 PM IST

जाणून घ्या आरोग्य, सौंदर्य, रेसिपी अशा विविध विषयावरच्या लाइफस्टाइल सेक्शनमधील आजच्या टॉप स्टोरीज...

ईद हा इस्लाम धर्मातील सर्वात महत्वाचा सण आहे. रमजान महिना ईद साजरी करत संपतो. आज ईद साजरी झाली. याखेरीज आज वैशाख महिन्यात शुक्ल पक्ष तृतीयेला साजरी होणारी अक्षय्य तृतीया साजरी झाली. या सेलिब्रेशनसोबतच गरमीचा पारा वाढला आहे. त्यामुळे आपल्याला आरोग्याची आणि स्किनची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या. याशिवाय तुम्ही फूड, प्रवास, सौंदर्य आणि आरोग्याशी संबंधित इतर टॉप लाइफस्टाइल बातम्याही जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

Eid Dessert Recipe: किमामी शेवयाशिवाय अपूर्ण आहे ईदचा सण, नोट करा या डेझर्टची रेसिपी

ईद उल फित्र म्हणजे ईद आज साजरी झाली. तुम्हालाही या ईदमध्ये केवळ तोंडातच नाही तर तुमच्या बिघडलेल्या नात्यातही गोडवा मिसळायचा असेल, तर किमामी शेवयाची ही खास रेसिपी ट्राय करा. मावा आणि पाकात बुडवलेले किमामी शेवया केवळ चवीलाच टेस्टी नाही तर बनवायलाही खूप सोपे आहेत. चला तर मग वाट कसली पाहताय, जाणून घेऊया ईदची ही खास डेझर्टची रेसिपी घेण्यासाठी इथे क्लिक करा.

Akshay Tritiya Recipe: अक्षय तृतीयेला खीर बनवण्यासाठी फॉलो करा ही ट्रिक, मिळेल देसी चव

खीर ही एक डिश आहे जी बहुतेक वेळा सणांच्या वेळी बनविली जाते. अक्षय तृतीयेला खीरचे विशेष महत्त्व असते. अनेक वेळा महिला तक्रार करतात की खीरला ती देसी चव येत नाही. आजीच्या हाताने बनवलेल्या प्रत्येक पदार्थाची चव वेगळी असते. अशा परिस्थितीत त्यांच्या हाताने बनवलेल्या खीरची गोष्ट सुद्धा वेगळीच असते. जे खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा खावे असे वाटते. तुम्ही बनवलेल्या खीरमध्ये जर तुम्हाला ती देसी चव दिसत नसेल तर तुम्ही आजींची ही ट्रिक फॉलो करू शकता. रेसिपी जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

Earth Day 2023: येणाऱ्या पिढ्यांसाठी पृथ्वी वाचवायची? या पाच गोष्टी रोज करा!

दरवर्षी २२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो. निसर्गाविषयी जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने वसुंधरा दिन साजरा केला जातो. काळाबरोबर, नवीन आव्हानांना पार करून निसर्ग आणि पृथ्वी वाचवण्याची गरज आहे. विकासाच्या शर्यतीत पर्यावरण रक्षणाची जबाबदारी धूसर होऊ नये यासाठी वसुंधरा दिनाची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. आई माणसाला जन्म देते पण तो याच पृथ्वीवर वाढतो. पृथ्वी ही सर्वात सुंदर गोष्ट आहे जिने मानवाला जीवन दिले आहे. पण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आज माणूस ती नष्ट करत आहे. मर्यादित नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर मानवाकडून इतक्या वेगाने होत आहे की ते वेळेपूर्वीच संपुष्टात येत आहेत. आपल्यालाच आपल्या या पृथ्वीसाठी काही गोष्टी आजपासून कोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहे हे इथे क्लिक करून जाणून घ्या.

Gud Sharbat Recipe: गुळाचे सरबत कडक उन्हात देईल थंडावा! जाणून घ्या रेसिपी आणि फायदे

उन्हाळ्यात गुळाचे सरबत पोटासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानले जाते. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे बनवायला खूप सोपे आहे आणि तुम्ही ते बनवून तुमच्या फ्रीजमध्ये ठेवू शकता. वास्तविक गुळाचे सरबत पिणे हा शरीरातील तापमान संतुलित ठेवण्याचा एक मार्ग असू शकतो. याशिवाय उन्हाळ्यात पोटाचा त्रासही वाढतो, अशावेळी या शरबताचे सेवन अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. तसेच उन्हाळ्यात गुळाचे सरबत पिण्याचे अनेक फायदे आहेत. पण त्याआधी गुळाचे सरबत बनवण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

Sattu Paratha Recipe: उष्णतेवर मात करण्यासाठी खा सत्तूचा पराठा! नोट करा रेसिपी

उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. काळजी न घेतल्यास आजारी पडण्याचे चान्सेस जास्त असतात. उन्हाळ्यात लोक शरीराला आतून थंड ठेवणारे पदार्थ खातात. सत्तू हे यापैकीच एक आहे. हे केवळ आपल्या शरीराला हायड्रेट ठेवत नाही तर बाहेरील उष्णतेपासून दूर ठेवते. अनेक पोषक तत्वांनी भरलेले सत्तू हे उर्जेचे पॉवरहाऊस देखील मानले जाते. सत्तू एक प्रकारचे पीठ आहे, ज्यामध्ये भरपूर प्रोटीन आढळते. विशेष म्हणजे सत्तूला भारतातच नाही तर परदेशातही खूप पसंत केले जाते. सत्तू पासून तुम्ही पराठा बनवू शकता. या पराठ्याची रेसिपी जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

WhatsApp channel