Headache In Summer: उन्हाळ्यात डोकेदुखी वाढलीये? ‘ही’ असू शकतात कारणे! ‘या’ उपायांमुळे मिळेल आराम
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Headache In Summer: उन्हाळ्यात डोकेदुखी वाढलीये? ‘ही’ असू शकतात कारणे! ‘या’ उपायांमुळे मिळेल आराम

Headache In Summer: उन्हाळ्यात डोकेदुखी वाढलीये? ‘ही’ असू शकतात कारणे! ‘या’ उपायांमुळे मिळेल आराम

May 09, 2024 03:32 PM IST

Headache In Summer: उन्हाळ्यात तापमान वाढल्याने डोकेदुखीचा त्रास अधिक वाढतो. विशेषत: काही शारीरिक हालचाली केल्या की, डोकेदुखी वाढते. ज्यासाठी काही कारणे जबाबदार असू शकतात.

उन्हाळ्यात डोकेदुखी वाढलीये? ‘ही’ असू शकतात कारणे! ‘या’ उपायांमुळे मिळेल आराम
उन्हाळ्यात डोकेदुखी वाढलीये? ‘ही’ असू शकतात कारणे! ‘या’ उपायांमुळे मिळेल आराम

Headache In Summer: उन्हाळ्यात डोकेदुखीची समस्या अनेकांना सतावते. या काळात डोकेदुखीचे महत्त्वाचे कारण म्हणजे वाढती उष्णता किंवा उन्हाच्या झळा आहेत. उन्हाळ्यात तापमान वाढल्याने डोकेदुखीचा त्रास अधिक वाढतो. विशेषत: काही शारीरिक हालचाली केल्या की, डोकेदुखी वाढते. ज्यासाठी काही कारणे जबाबदार असू शकतात.

उन्हाळ्यात डोकेदुखीसाठी ‘ही’ असू शकतात कारणे:

> डिहायड्रेशन

> उष्माघात किंवा उष्णतेमुळे अस्वस्थता

> जास्त वेळ उन्हात राहणे

> कोणताही विशिष्ट वास

> उष्णतेमध्ये व्यायाम करणे

Jewellery Market: सर्वात स्वस्त आणि मस्त ज्वेलरी खरेदी करायची? मग मुंबईतील ‘या’ बाजारांमध्ये नक्की जा

उन्हाळ्यातील डोकेदुखीपासून आराम मिळवण्याचे उपाय :

उन्हाळ्यात डोकेदुखीची समस्या उद्भवू लागली, तर ‘या’ उपायांनी त्यापासून सुटका मिळवू शकता.

> जर तुम्हाला डिहायड्रेशनमुळे डोकेदुखी होत असेल, तर त्यावर उपाय करण्यासाठी, दिवसभर भरपूर पाणी पिणे आणि तुमच्या आहारात द्रवपदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. काकडी, टरबूज इत्यादी पाण्याचं प्रमाण जास्त असलेली फळे खाण्यास सुरुवात करा. जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही आणि डोकेदुखीची समस्या उद्भवणार नाही.

> उन्हाळ्यात उन्हामुळे डोकेदुखी होत असेल, तर सूर्यप्रकाशात जाणे पूर्णपणे टाळावे. जर तुम्हाला उन्हात बाहेर जायचे असेल, तर तुमचे डोके पूर्ण झाकून घ्या. जेणेकरून सूर्यप्रकाश थेट डोक्यावर पडणार नाही.

> याशिवाय सुगंधविरहित क्रीम, सनस्क्रीन आणि इतर लोशन वापरा.

> खूप गरम असताना तीव्र व्यायाम करणे टाळा. उष्णतेमुळे डोकेदुखी होऊ शकते.

> तुम्ही कधीही डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे घेण्याचा प्रयत्न करू नका.

Bael Juice Side Effects: या लोकांनी चुकूनही पिऊ नये बेल फळाचे ज्यूस, हे होतात दुष्परिणाम

डोकेदुखीचा त्रास झाल्यास ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा!

संशोधनानुसार, आहारात हिरव्या पालेभाज्या समाविष्ट केल्याने मायग्रेन आणि डोकेदुखीच्या समस्यांपासून आराम मिळतो. पालक आणि ब्रोकोली सारख्या भाज्यांमध्ये फॉलिक ॲसिड, मॅग्नेशियम, लोह, व्हिटॅमिन बी ६ आणि बी १२सारखे पोषक घटक असतात. या गोष्टींचा आहारात नक्की समावेश करा.

फॅटी फिश: फॅटी फिशमध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिडस्, जीवनसत्त्वे बी आणि बी३ आढळतात, जे डोकेदुखी वाढण्यापासून रोखतात.

बिया आणि नट्स: हेल्दी फूड तुम्हाला आजारी पडण्यापासून आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून वाचवतात. आहारात बिया आणि नट्स खाल्ल्याने त्यातील मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी यांसारख्या घटकांमुळे डोकेदुखी उद्भवत नाही.

हे पदार्थही खा : दही, धान्य, कडधान्ये, अंजीर, डार्क चॉकलेट असे पदार्थ रोजच्या आहारात खाल्ल्याने डोकेदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो.

Whats_app_banner