Hartalika Teej: विवाहित महिलांसाठी खास आहे हरतालिका पूजन, नैवेद्यासाठी बनवा चविष्ट खीर-hartalika teej make a delicious rice kheer recipe for hartalika ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hartalika Teej: विवाहित महिलांसाठी खास आहे हरतालिका पूजन, नैवेद्यासाठी बनवा चविष्ट खीर

Hartalika Teej: विवाहित महिलांसाठी खास आहे हरतालिका पूजन, नैवेद्यासाठी बनवा चविष्ट खीर

Sep 05, 2024 12:39 PM IST

Recipe for Hartalika: तुम्हालाही प्रसादात काहीतरी वेगळं बनवून ही हरतालिका तीज साजरी करायची असेल, तर किचनमध्ये उपलब्ध असलेल्या काही गोष्टींसोबत चविष्ट खीर तुम्ही बनवू शकता.

हरतालिका तीज स्पेशल रेसिपी
हरतालिका तीज स्पेशल रेसिपी (cubesnjuliennes.com)

Hartalika teej recipe: हरतालिका तीजचा उपवास प्रत्येक विवाहित महिलेसाठी खूप खास असतो. या दिवशी विवाहित स्त्रिया दिवसभर उपवास करतात आणि माता पार्वती आणि भगवान शिव यांना विविध गोष्टी अर्पण करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद घेतात. तुम्हालाही प्रसादात काहीतरी वेगळं बनवून ही हरतालिका तीज साजरी करायची असेल, तर किचनमध्ये उपलब्ध असलेल्या काही गोष्टींसोबत चविष्ट खीर तुम्ही बनवू शकता. 

ही खीर जितकी चवदार आहे तितकीच बनवायला सोपी आहे. या खीरची खासियत म्हणजे ती बनवण्यासाठी तुम्हाला स्वयंपाकघरात तासन्तास उभं राहावं लागत नाही, ही खीर अवघ्या १० ते १५ मिनिटात तयार होते. चला तर मग उशीर न करता नैवेद्याची खीर कशी बनवायची ते जाणून घेऊया.

खीर बनवण्यासाठी साहित्य-

-१/४ कप भरडलेले तांदूळ

- १ लिटर फुल क्रीम दूध

- १ टीस्पून तूप

- २ चमचे बदामचे काप

- २ चमचे काजूचे काप

- १ टेबलस्पून चारोळे

-२ चमचे कापलेला सुका नारळ

- १ टीस्पून पिस्त्याचे काप

- मनुका

- अर्धा कप साखर

- अर्धा टीस्पून वेलची पावडर

-केसर

तांदळाची खीर कशी बनवावी-

खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ दोन ते तीन वेळा नीट धुवून घ्यावे. यानंतर तांदूळ सुमारे २५ मिनिटे पाण्यात भिजवून बाजूला ठेवावे. नंतर गॅसवर कुकर ठेवा. कुकरमध्ये ३ ते ४ चमचे पाणी टाकून फिरवा. ही टिप फॉलो केल्याने तुम्हाला असा फायदा होईल की, कुकरमध्ये दूध घालताना ते कुकरला चिकटणार नाही. आता कुकरमध्ये एक लिटर फुल क्रीम दूध घाला. आता हे दूध मध्यम आचेवर दोन ते तीन वेळा उकळून घट्ट होईपर्यंत शिजवावे. आता दुसऱ्या कढईत एक चमचा तूप गरम करून त्यात सर्व चिरलेले ड्रायफ्रूट्स घालून एक मिनिट कोरडे भाजून घ्यावे. ड्रायफ्रूट्सचा रंग हलका सोनेरी होऊ लागल्यावर ते एका प्लेटमध्ये काढून वेगळे ठेवावे. आता एका भांड्यात उकळलेल्या दुधातून थोडेसे दूध बाजूला काढा आणि त्यात थोडे केसर घाला. आता या टप्प्यावर आधीच भिजवलेले तांदळाचे पाणी वेगळे करून दुधात टाकावे. यानंतर दुधात आधी भाजलेले ड्रायफ्रूट्स घालून चांगले ढवळावे.

यानंतर कुकरचे झाकण ठेवून शिट्टी वाजण्यापूर्वी मध्यम आचेवर खीर शिजवावी. शिट्टी येत आहे असे वाटताच गॅस कमी करून खीर आणखी २-३ मिनिटे शिजवावी. यानंतर गॅस बंद करा आणि शिट्टीचा दाब सोडू द्या. नंतर कुकरचे झाकण उघडून त्यात अर्धा कप साखर घालून मंद आचेवर पुन्हा खीर शिजवावी. यानंतर खीरीमध्ये अर्धा चमचा वेलची पूड आणि केसरचे दूध घालावे. खीर थोडी थंड झाल्यावर एक वाटी खीर ग्राइंडिंग जारमध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करावी. आता कुकरमध्ये ठेवलेल्या खीरमध्ये ही पेस्ट घालून दोन ते चार मिनिटे शिजवावी. आता या खीरीच्या वर मनुका घालून खीर आणखी एक मिनिट ढवळा. अशाप्रकारे तुमची चविष्ट खीर तयार आहे.

विभाग