Hartalika Naivedya Recipe: आज म्हणजेच ६ सप्टेंबर रोजी देशभरातील विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी हरतालिका तीजचा उपवास करणार आहेत. आजचा दिवस प्रत्येक विवाहित महिलेसाठी खूप खास आहे. या दिवसाची तयारी महिला अनेक दिवस आधीच सुरू करतात. यादिवशी विवाहित स्त्रिया सोळा अलंकार करतात आणि भगवान शिव आणि माता पार्वतीला प्रसाद म्हणून विविध प्रकारच्या गोष्टी अर्पण करतात. यामध्ये नैवेद्य म्हणून दिल्या जाणाऱ्या अशाच एका पारंपारिक पदार्थाचे नाव आहे पुडाची करंजी. पुडाच्या करंजीचा प्रसाद पिठापासून बनवला जातो. ज्यामध्ये खवा, रवा, खोबरे आणि बेसन आतून भरले जाते. या खास दिवशी तुम्हालाही माता पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी पुडाच्या करंजीचा नैवेद्य ठेवायचा असेल, तर ही सोपी रेसिपी फॉलो करा.
- २ कप मैदा
- अर्धी वाटी तूप
-३/४ कप रवा
-३/४ कप पिठीसाखर
- १ कप ड्राय फ्रूट्स
- अर्धा चमचा छोटी वेलची
पुडाच्या करंजीचा नैवेद्य बनवण्यासाठी प्रथम पीठ चाळून स्वच्छ करा. यानंतर पिठात तूप घालून कोरड्या हातांनी चांगले चोळा. नंतर पिठात हळूहळू पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या, आता ओल्या कापडाने झाकून बाजूला ठेवा. यानंतर, पुडाच्या करंजीचे सारण तयार करण्यासाठी, एका कढईत थोडे तूप गरम करून त्यात रवा घालून मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. यानंतर रव्यामध्ये चिरलेला ड्रायफ्रूट्स घालून तळून घ्या आणि नंतर त्यात पिठीसाखर आणि वेलची पूड घाला. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या सारणात मावाही घालू शकता. आता सर्वकाही चांगले एकजीव करा आणि थंड होण्यासाठी ठेवून द्या.
पुडाच्या करंज्या तयार करण्यासाठी, आता पिठाचे छोटे गोळे बनवा आणि ते लाटून घ्या. यानंतर त्यात तयार केलेले सारण भरून त्याला हवा तो आकार दिल्यानंतर चारही बाजूनीं बंद करा. आता कढईत तूप गरम करून त्यात करंज्या घालून मंद आचेवर तळून घ्या. पुडाच्या करंज्या जरा जास्त आचेवर तळलात तर त्या बाहेरून करपतील आणि आतून कच्चे राहील. त्यामुळे तळताना याची विशेष काळजी घ्या. आता तुमचा पुडाच्या करंजीचा नैवेद्य हरतालिका तीजला माता पार्वती आणि भगवान शिव यांना अर्पण करण्यासाठी तयार आहे.