Tips and Tricks to Get Ready in Traditional Style: ६ सप्टेंबर रोजी हरतालिका साजरी केली जाणार आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया शंकर-पार्वतीची पूजा करतात आणि त्यांच्या अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात. हे व्रत विशेष सुख आणि सौभाग्यासाठी असल्याने सोळा श्रृंगार नक्कीच केले जातात. पारंपरिक लूकसाठी महिला अनेकदा अभिनेत्रींचा लूक कॉपी करतात, पण अनेकदा तयारी करताना काही चुका होतात, ज्यामुळे परफेक्ट लुक मिळत नाही. यावेळी तयार होताना या टिप्स लक्षात ठेवल्या तर चेहरा हिरोईन्सपेक्षा कमी सुंदर दिसणार नाही.
विवाहित स्त्रीयांसाठी मांगटिकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बऱ्याच ठिकाणी हरतालिकेला सासरच्या मंडळींकडून मिळालेला मांगटिका घालणे शुभ मानले जाते. पण कधी कधी हा मांगटिका फिक्स करणे अवघड वाटतं. त्यामुळे मांगटिका फिक्स करण्यासाठी डबल साइडेड टेप किंवा आयलॅश ग्लूने कपाळावर लावता येते. त्याचवेळी केसांचा मधून भांग काढून मांगटिकामध्ये सेफ्टी पिन टाकून नंतर पिनने केसांमध्ये लावा. यामुळे मांगटिकाची छोटी साखळी केसांना सहज लावता येते.
सेंटर भांगमध्ये सिंदूर लावायचा असेल तर फक्त लिक्विड सिंदूरने तो लूक मिळणार नाही. त्यामुळे केसांचे मध्यभागी पार्टिशन करून त्यावर लिक्विड सिंदूर लावा आणि नंतर कोरडे सिंदूर भरा. असे केल्याने सिंदूर फिक्स होईल आणि घामाने वाहणार नाही.
नथ घालताना मेडिकल स्टोअरमध्ये मिळणारा थोडा स्पिरिट लावावा. स्पिरिटला रबिंग अल्कोहोल असेही म्हणतात. हे लावल्याने नथ सहज नाकात जाईल. तसेच नथसोबत सपोर्टर घालू नका.
हरतालिकेला तयार होण्यासाठी तुम्ही खूप हेवी साडी निवडत असाल तर पूजेच्या वेळी त्यात प्लीट्स बनवा. यामुळे तुम्हाला कमी गरमी जाणवेल आणि पूजा करणे सोपे वाटेल. तसेच तुमची साडी खराब होण्यापासून वाचेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)