Face Pack for Glowing Bright Pink Skin: हरतालिकेच्या दिवशी चेहऱ्यावर नैसर्गिक सौंदर्य हवे असेल तर फेस वॉश आणि साबण सोडून हा फेस पॅक लावण्यास सुरुवात करा. पुढील आठवडाभरात त्वचा केवळ ब्राइट दिसणार नाही तर त्वचेवर गुलाबी चमक सुद्धा दिसेल. हा फेस पॅक नैसर्गिक ब्लीच तसेच त्वचेला एक्सफोलिएट करण्याचे आणि डेड स्किन काढून टाकण्याचे काम करतो. हा फेस पॅक बनवणे सोपे आहे. चेहऱ्यावर पिंक ग्लो मिळवण्यासाठी फेस पॅक खूप प्रभावी आहे. आतापासून रोज लावायला सुरुवात केला तर हरतालिकेच्या दिवशी तुमचे सौंदर्य नैसर्गिकरित्या खुलेल. चला तर मग जाणून घेऊया हा फेस पॅक कसा बनवायचा ज्यामुळे त्वचेवर चमकदार प्रभाव पडण्यास मदत होईल.
हा फेस पॅक बनवण्यसााठी तुम्हाला आवश्यक आहे -
- १ कच्चा बटाटा
- अर्धा बीटरूट
- तांदळाचे पीठ एक चमचा
- गुलाब जल
हा फेस पॅक बनवण्यासाठी प्रथम बटाटे आणि बीटरूट सोलून त्याचे छोटे तुकडे करा. मग ग्राइंडरच्या जारमध्ये या दोन गोष्टी मिसळून त्याची पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करण्यासाठी त्यात थोडे गुलाब पाणी घाला. जेणेकरून ती सहज पेस्ट बनू शकेल. आता ते एका बाऊलमध्ये काढून घ्या. आता त्यात एक चमचा तांदळाचे पीठ टाकून मिक्स करून फेस पॅक तयार करा. पहिल्या दिवशी चेहरा फेस वॉशने स्वच्छ करा. जेणेकरून अतिरिक्त धूळ आणि तेल निघून जाईल. आता चेहऱ्यावर फेस पॅक लावा आणि अर्धा तास राहू द्या. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.
बटाट्यामध्ये ब्लिचिंग गुणधर्म असतात. ज्याचा दररोज चेहऱ्यावर वापर करून त्वचा चमकदार होण्यास मदत होते. हरतालिकेच्या दिवशी चेहऱ्यावर चमक पाहायची असेल तर पार्लरमध्ये न जाता या फेस पॅकच्या मदतीनेच तुम्हाला ग्लो मिळेल. रोज फेस वॉश केल्यानंतर हा फेस पॅक लावा आणि अर्ध्या तासानंतर स्वच्छ करा. बीटरूट त्वचेला गुलाबी ग्लो देण्यास मदत करेल. त्याचबरोबर बटाटे त्वचेवरील डाग हलके करतील. तसेच तांदळाचे पीठ नैसर्गिक ओलावा आणि मृत त्वचा एक्सफोलिएट करण्यास मदत करेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)