Hariyali Teej 2024: श्रावणामध्ये हरियाली तीजचा सण साजरा केला जाणार आहे. खासकरून हा सण महिलांसाठी असतो. खरं सांगायचे तर हा सण महाराष्ट्रात नाही तर बाहेरच्या राज्यात साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्रात श्रावणात मंगळागौर हा सण साजरा केला जातो. या सणाची तयारी महिला बऱ्याच दिवसांपासून करत आहेत. या दिवशी शृंगाराबरोबरच महिला घरी विविध प्रकारचे चविष्ट पदार्थही तयार करतात.
मंगळागौर असो किंवा तीज सणाला महिलांना गोड पदार्थ बनवायला आवडतात. त्याचबरोबर घरच्यांनाही ही मिठाई खायला खूप आवडते. मंगळागौर आणि हरियाली तीजच्या निमित्ताने तुम्हालाही गोडात काहीतरी वेगळं आणि चविष्ट बनवायचं असेल तर, तुम्ही नारळाची खीर बनवू शकता. नारळाची खीर कशी बनवायची? त्यासाठी कोणते साहित्य लागते? आहे आज आपण पाहणार आहोत.
- तांदूळ- १०० ग्रॅम
-नारळाचे दूध- ३ टिस्पून
- मिल्कमेड- १ टिस्पून
- खवा- २०० ग्रॅम
- बडीशेप पावडर- १ चमचा
-वेलची पूड- १ टीस्पून
- दालचिनी पावडर- १ टीस्पून
- केसरच्या काही काड्या
- पिस्ता, अक्रोड- मूठभर
- साखर किंवा गूळ- चवीनुसार
नारळाची चविष्ट खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ सुमारे १५ मिनिटे भिजत ठेवा. नंतर नारळाचे दूध काढून त्यात साखर, केसर आणि खवा घाला. हे मिश्रण चांगले मिक्स झाल्यावर त्यात दालचिनी पावडर, वेलचीपूड आणि बडीशेप पावडर घालून उकळून घ्या. नारळाचे दूध चांगले शिजल्यावर त्यात भिजवलेले तांदूळ घाला.
आता हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा. नंतर एका कढईत तूप घालून त्यात पिस्ता आणि अक्रोड घालून दोन्ही भाजून बाजूला ठेवावे. या दोन्ही गोष्टी थंड झाल्यावर त्याची पावडर करून आणि काही ड्रायफ्रूट्स तसेच खीरमध्ये घालून एकजीव करा. आता तुमची चविष्ट नारळाची खीर सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.