Traditional Ladoo Recipe from Sattu: आजपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. गणेश चतुर्थीनिमित्त घरोघरी गणपती बाप्पाची मूर्ती बसवून पूजा केली जाते. शिवाय बाप्पाच्या आवडीचे गोड पदार्थ बनवून नैवेद्य आणि प्रसाद केला जातो. आपण नेहमीच बाप्पासाठी विविध प्रकारचे मोदक, खीर असे अनेक पारंपरिक पदार्थ बनवत असतो. परंतु यंदा तुम्हाला काहीतरी वेगळे करायचे असेल, तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला सातूपासून पारंपरिक पद्धतीचे लाडू बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हे लाडू घरी सर्वांनाच आवडतील. शिवाय तुमचे कौतुकही होईल.
-२५० ग्रॅम भाजलेले हरभरे
-काजू
-बदाम
-सूर्यफूल बिया
-मनुका
-पिस्ता
-एक वाटी तूप
-एक कप गव्हाचे पीठ
-रवा अर्धा कप
-एक कप गूळ
-एक चमचा वेलची पूड
-सर्वप्रथम भाजलेले हरभरे सोलून मिक्सरमध्ये टाकून बारीक पावडर बनवा. याच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी ताजा सातू बनवू शकाल. त्याची चव उत्कृष्ट लागेल.
-त्यानंतर पॅनमध्ये एक चमचा देशी तूप घालून बारीक चिरलेले बदाम, काजू, पिस्ता आणि सूर्यफुलाच्या बिया चांगल्या प्रकारे तळून घ्या.
-त्यांनतर मनुके घालून परतून घ्या.
- ते चांगले तळून वेगळे करा.
-आता एका जाड कढईत एक वाटी देशी तूप गरम करून त्यात एक वाटी गव्हाचे पीठ घालून चांगले भाजून घ्या.
- गव्हाच्या पिठाला सुवासिक वास येऊ लागल्यावर त्यात एक छोटा कप रवा टाका आणि सोबत सातूही घाला.
- हे पदार्थ नीट भाजून घ्या आणि गरजेनुसार अजून थोडं तूप घाला. जेणेकरून पीठ सोनेरी भाजले जाईल.
-आता त्यात भाजलेले ड्रायफ्रुट्स टाका आणि हे मिश्रण मिक्स करून चांगले ढवळा.
-जेव्हा ते पूर्णपणे भाजून एकसारखे होईल तेव्हा त्यात थोडेथोडे गूळ घाला.
-नंतर त्यात वेलची पूड घालावी.
-आता गॅस बंद करून मिश्रण थोडं थंड होऊ द्या.
- हवे असल्यास हाताच्या मदतीने गोल लाडू तयार करा किंवा साच्यात घालून मोदकांचा आकार द्या.
-सातूपासून बनवलेले झटपट लाडू गणपती बाप्पाला अर्पण करण्यासाठी तयार आहेत.