मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Teddy Day Wishes: टेडी बेअरचा क्युटनेस होईल दुप्पट, जेव्हा सोबत द्याल या खास शुभेच्छा

Teddy Day Wishes: टेडी बेअरचा क्युटनेस होईल दुप्पट, जेव्हा सोबत द्याल या खास शुभेच्छा

Feb 10, 2024 08:28 AM IST

Happy Teddy Day Quotes: व्हॅलेंटाईन वीकमधील चौथा दिवस म्हणजे टेडी बेअर डे. या दिवशी कपल्स एकमेकांना एक क्यूट टेडी बियर भेट देतात. तुम्ही तुमच्या पार्टनरला टेडीसोबत हे खास मॅसेज लिहून त्यांचा दिवस आणखी खास बनवू शकता.

टेडी डेच्या शुभेच्छा
टेडी डेच्या शुभेच्छा (unsplash)

Teddy Day 2024 Wishes Message: व्हॅलेंटाईन डेच्या आधी आठवडाभर प्रेमीयुगुल एकमेकांना विविध गिफ्ट देतात. या लव्ह वीकमधील चौथा दिवस म्हणजे टेडी डे. हा १० फेब्रुवारीला साजरा केला जाते. तुम्हालाही तुमच्या पार्टनरच्या ओठांवर हसू आणि त्याच्या डोळ्यात प्रेम पाहायचे असेल तर तुम्ही एक क्यूट टेडी बेअर गिफ्ट करू शकता. तसेच तुम्ही या टेडीसोबत एक रोमँटिक मॅसेज लिहून दिले तर त्यांचा आनंद द्विगुणीत होईल. पाहा या प्रसंगाशी मॅच करणारे कोट, मॅसेज किंवा विशेस.

ट्रेंडिंग न्यूज

माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू,

माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू,

काय सांगू माझ्यासाठी क्यूट टेडी बेअर आहेस तू...!

Happy Teddy Day!

 

टेडी बेअर दिसायला किती सुंदर वाटतात,

हृदयात एकाच क्षणात उतरुन जातात,

त्यांना पाहून तुझीच आठवण येते,

काय सांगू तुला तुच माझी टेडी बेअर वाटते

Happy Teddy Day!

पाठवत आहे खास टेडी तुला

स्वतः जवळ सांभाळून ठेव त्याला

प्रेम असेल तर एक टेडी पाठव मला

Happy Teddy Day!

 

विश्वासाने मी तुझ्या मनात जागा मिळवली

असाच विश्वास तुझा माझ्यावर राहो

तुझ्याकडून काहीच नको

पण पुढच्या जन्मी मला प्रेम करायला

फक्त तू आणि तूच मिळो...

Happy Teddy Day!

तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण

प्रत्येक वेळी हा टेडी करेल मला तुझी आठवण

राहू दे सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर

Happy Teddy Day!

 

तू सदैव हसत रहा,

आनंदी रहा, खुश रहा

मात्र सदैव टेडी बेअर सारखे

माझ्या सोबत रहा

Happy Teddy Day!

मन करतं की

तुला माझ्या मिठीत घेऊ

तुला टेडी बेअर बनवून

नेहमी माझ्या सोबत ठेवू...

Happy Teddy Day!

WhatsApp channel