Happy Rose Day 2025 Wishes In Marathi : फेब्रुवारी महिना प्रत्येक प्रेमी हृदयासाठी खूप खास असतो. प्रेमात बुडालेली जोडपी या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. वर्षातील हा असाच एक महिना आहे, जेव्हा लव्ह बर्ड्स गुलाब देऊन आपल्या व्हॅलेंटाईनला आपल्या हृदयातील गोष्टी सांगतात. व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात ‘रोझ डे’ने होते. दरवर्षी ७ फेब्रुवारी रोजी ‘रोझ डे’ साजरा केला जातो. रोझ डेच्या या खास प्रसंगी तुम्हालाही आपल्या भावना एखाद्या खास व्यक्तीसोबत शेअर करायच्या असतील, तर गुलाबाच्या फुलासोबत ‘हे’ मेसेज परफेक्ट ठरतील.
जेव्हा जेव्हा मी गुलाबाचं फुल पाहीन,
माझ्या डोळ्यांसमोर तुझाच चेहरा समोर येईल!
हॅप्पी रोझ डे
माझ्या गुलाबाच्या फुला,
काय सांगू तुला,
आठवण येते मला
पण इलाज नाही त्याला
कारण प्रेम म्हणतात याला!
हॅप्पी रोझ डे
जर आयुष्यात काही बनायचं असेल तर,
गुलाबाचं फुल बना, कारण,
ते त्या हातांनाही सुंगधित करतं
जे त्याल्या कुस्करून फेकून देतात!
हॅप्पी रोझ डे
माझ्या वेडेपणाला काहीच मर्यादा नाही,
मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही,
मी गुलाब आहे तुझ्या बागेतला,
माझं तुझ्याशिवाय या जगात कुणीच नाही.
हॅप्पी रोझ डे
लाल रंग प्रेमाचा, पिवळा आहे मैत्रीचा,
पांढऱ्यातून मिळते शांती
आणि गुलाबी आहे कृतज्ञतेचा…
म्हणूनच आज मी तुला सर्व रंगाची फुल देत आहे….
हॅप्पी रोझ डे
मला प्रेमात हरायचं
अथवा जिंकायचं नाही,
फक्त तुझ्यासोबत
आयुष्यभर जगायचं आहे.
हॅप्पी रोझ डे
तुझ्या ओठांवर नियमित
गुलाबाचं फुल उमलावं,
तू नेहमीच आनंदी असावं,
मी आयुष्यभर फक्त तुझ्यासोबत राहावं
आणि तुझ्या प्रत्येक सुख दुःखात सहभागी व्हावं!
हॅप्पी रोझ डे
तुला मनातलं सांगताना,
हातात उमलली गुलाबाची कळी,
न सांगता समजलं तुला,
जेव्हा पाहिली तुझ्या गालावरची खळी
हॅप्पी रोझ डे
तू फक्त बागेत फुलणारं
गुलाबाचं फुल नाहीस,
तु आहेस माझं जीवन,
तुला पाहात राहणं हेच आहे
माझ्या जगण्याचे साधन.
हॅप्पी रोझ डे
तुझी चाहुल लागताच
माझा चेहरा खुलतो,
तुझा स्पर्श होताच
माझं मन मोहरतं.
अशा माझ्या प्रियेला
हॅप्पी रोझ डे
आयुष्यभर सोबत असावी
अशी साथ आहेस तू,
माझ्या जीवनातील सुंदर स्वप्न आहेस तू,
लोक काही म्हणाले, तरी माझ्यासाठी
सुंदर गुलाबाचं फुल आहेस तू!
हॅप्पी रोझ डे
संबंधित बातम्या