Happy Rose Day 2024 Wishes: लव्ह बर्ड्ससाठी फेब्रुवारी महिना खूप खास आहे. याच महिन्यात व्हॅलेंटाईन डे येतो. ७ फेब्रुवारीपासून प्रेमाचा सप्ताह सुरू होतो. या आठवड्याची सुरुवात रोझ डे पासून होते. व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस रोझ डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कपल्स एकमेकांना गुलाब देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. या खास प्रसंगी तुम्ही तुमच्या जोडीदाराला काही उत्तम कविता, शायरी, मॅसेज पाठवू शकता. येथे बेस्ट कविता, रोमँटिक मॅसेज वाचा.
जिचे नाव सदैव असते माझ्या ओठी
प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे गुलाब
आणले मी तुझ्यासाठी
Happy Rose Day!
गुलाबाच्या फुलाला गुलाब कसं देऊ,
तूच आहेस श्वास माझा
तुझ्याशिवाय कसं जगू
Happy Rose Day!
भेटत नाहीस रोज रोज
पण आठवणीत असतेच दररोज
पाठवत आहे रेड रोझ
जो तुला माझी आठवण करून देईल दररोज
Happy Rose Day!
लाल रंग प्रेमाचा,
पिववळा आहे मैत्रीचा,
पांढऱ्यातून मिळते शांती
आणि गुलाबी आहे कृतज्ञतेचा
म्हणून आज मी तुला
सर्व रंगाची फुलं देत आहे
Happy Rose Day!
गुलाबाच्या फुला
काय सांगू तुला
आठवण येते मला
पण इलाज नाही त्याला
कारण प्रेम म्हणतात याला
Happy Rose Day!
आयुष्यभर सोबत असावी
अशी साथ आहेस तू,
माझ्या जीवनातील सुंदर
स्वप्न आहेस तू
लोक काही म्हणाले
तरी माझ्यासाठी सुंदर
गुलाबाचे फुल आहेस तू
Happy Rose Day!
फुल सुकलं तरी
सुगंध देतंच राहतं
तसंत आपलं प्रेम
आयुष्याच्या शेवटापर्यंत
सुगंधितच राहावं
Happy Rose Day!
तू सोबत असताना
मला गरज कोणाची लागज नाही
तू फक्त सोबत राहा
मी दुसरं काही मागत नाही
Happy Rose Day!
तुला मनातलं सांगताना
हातात उमलली गुलाबाची कळी
न सांगता समजलं मला
जेव्हा पाहिली तुझ्या गालावरची खळी
Happy Rose Day!
माझ्या वेडेपणाला काहीच मर्यादा नाही
मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही
मी गुलाब आहे तुझ्या बागेतला
माझं तुझ्याशिवाय या जगात कुणीच नाही
Happy Rose Day!