Republic Day Message, wishes: २६ जानेवारीचा आजचा महत्त्वपूर्ण दिवस प्रत्येक भारतीयांसाठी फार अभिमानाचा दिवस असतो. यंदा भारत ७५व्या प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. याच दिवशी भारतीय संविधानाचा स्वीकार केला गेला. याच खास दिनानिमित्त दिल्ली विजय चौकात विशेष परेडचेही आयोजन करण्यात येते. याशिवाय भारतभर विविध कार्यक्रम केले जातात. हा दिवस प्रत्येक भारतीय मनापासून सेलिब्रेट करतो. या खास दिनी आपण आपल्या मित्रांना, कुटुंबियांना आणि इतर ओळखीच्या लोकांना शुभेच्छा देतात. म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत देशभक्तीपर शुभेच्छा (Wishes, Images, Photos, Quotes, HD Wallpaper, SMS, Shayari, Whatsapp and Facebook status) संदेश. हे शुभेच्छा संदेश तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवून आजचा दिवस साजरा करू शकता.
>तीन रंग प्रतिभेचे, नारंगी, पांढरा अन् हिरवा, रंगले न जाणो किती रक्ताने, तरी फडकतो नव्या उत्साहाने.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
>बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
>भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा विविधता जपणा-या एकात्मतेचा.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
>उत्सव तीन रंगाचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी..
ज्यांनी भारत देश घडवला…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
>देशभक्तांच्या बलिदानामुळे आपण स्वतंत्र झालो,
कोणी विचारेल कोण आहात तुम्ही,
गर्वाने सांगा आम्ही भारतीय आहोत.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
(मेसेज क्रेडिट: सोशल मीडिया)