Republic Day Wishes: प्रजासत्ताक दिनी देशभक्तीचे रंग भरतील हे मॅसेज, परिवार आणि मित्रांसोबत करा शेअर-happy republic day 2024 wishes and messages share with your family and friends on 26 january ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Republic Day Wishes: प्रजासत्ताक दिनी देशभक्तीचे रंग भरतील हे मॅसेज, परिवार आणि मित्रांसोबत करा शेअर

Republic Day Wishes: प्रजासत्ताक दिनी देशभक्तीचे रंग भरतील हे मॅसेज, परिवार आणि मित्रांसोबत करा शेअर

Jan 25, 2024 06:28 PM IST

Happy Republic Day 2024: देशभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जातो. या खास प्रसंगी प्रत्येक जण एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतात. आपल्या परिवार आणि मित्रांना ७५व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी हे मॅसेज पहा

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा संदेश
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा संदेश (freepik)

Republic Day Message For Family and Friends: २६ जानेवारी रोजी देशभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी भारत आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. यानिमित्ताने सर्व देशवासीय आपापल्या पद्धतीने हा दिवस साजरा करतात. या विशेष प्रसंगी तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना देशभक्तीपर शुभेच्छा, कोट्स, कविता आणि संदेश पाठवू शकता. येथे आम्ही तुमच्यासाठी काही खास प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत. हे मॅसेज आपला परिवार, नातेवाईक, मित्रांसोबत शेअर करून देशभक्तीचे रंग भरा.

स्वातंत्र्याची ध्वजा फडकते

सूर्य तळपतो प्रगतीचा

भारतभूमीच्या पराक्रमाला

मुजरा हा मानाचा

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

उत्सव तीन रंगांचा,

आभाळी आज सजला,

नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,

ज्यांनी भारत देश घडविला...

भारत देशाला मानाचा मुजरा!

Happy Republic Day!

 

देश विविध रंगाचा,

देश विविध ढंगाचा

देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा

प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!

 

ज्यांनी लिहिली आझादीची गाथा

त्यांच्या चणरी ठेवितो माथा

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

एक देश, एक स्वप्न,

एक ओळख

आम्ही भारतीय...!

Happy Republic Day 2024!

 

 

स्वतःसाठी स्वप्न सगळेच बघतात,

देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया,

चला आपण आपला भारत

सुरक्षित आणि विकसित बनवूया

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

 

मुक्त आमचे आकाश सारे,

झुलती हिरवी राने वने,

स्वैर उडती पक्षी नभी,

आनंद आज उरी नांदे,

Happy Republic Day 2024!

 

बलसागर भारत व्हावे,

विश्वात शोभूनी राहावे,

भारतभूमीच्या तिरंग्याची शान कायम राहावी

हेच स्वप्न प्रत्येक भारतीयाने कायम पाहावे

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

तिरंगा उंच उंच उडू द्या,

आपल्या हृदयातील अभिमान आणि एकतेने,

या प्रजासत्ताक दिनी आपण आपल्या राष्ट्राला

एक चांगला भाग बनवूया

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

 

 

असा भारत हवाय, जिथे सगळ्यांची जात भारतीय असेल,

धर्म देश प्रेम उच्च नीच भेदभाव सीमा पार असेल,

नातं असेल भारतीयत्वाचा, सुख शांती समाधान मिळेल,

शत्रूचा थरकाप उडवील, एवढी विचारांना धार असेल,

प्रत्येक भारतीयाचा अन्यायावर होणारा वार असेल,

जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात भारताविषयी आदर असेल.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

विभाग