Propose Day 2025: हटके स्टाईलनं करा प्रपोज, जोडीदाराला पाठवा ‘हे’ खास मेसेज, वाचून होईल खूप खूश!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Propose Day 2025: हटके स्टाईलनं करा प्रपोज, जोडीदाराला पाठवा ‘हे’ खास मेसेज, वाचून होईल खूप खूश!

Propose Day 2025: हटके स्टाईलनं करा प्रपोज, जोडीदाराला पाठवा ‘हे’ खास मेसेज, वाचून होईल खूप खूश!

Ashwjeet Jagtap HT Marathi
Published Feb 07, 2025 12:37 PM IST

Propose Day Wishes: प्रपोज डे निमित्त आपल्या जोडीदाराला खास मेसेज पाठवून प्रेमातील गोडवा वाढवा.

प्रपोज डे निमित्त तुमच्या जोडीदाराला पाठवा ‘हे’ खास मेसेज
प्रपोज डे निमित्त तुमच्या जोडीदाराला पाठवा ‘हे’ खास मेसेज (HT Photo)

Propose Day WhatsApp and Facebook Status: व्हॅलेंटाईन वीक सुरुवात झाली आहे. प्रेमाचा आठवडा सुरू होताच कपल्स आपल्या पार्टनरला भेटवस्तू, रोमँटिक डेट्स, फुले, चॉकलेट्स आणि बरेच काही देऊन आश्चर्यचकित करून आपले प्रेम व्यक्त करतात. व्हेलंटाईन डेची सुरुवात ७ फेब्रुवारीपासून होते आणि शेवट १४ फेब्रुवारीला होतो.  या व्हेलंटाईन वीकमधील प्रपोज डे विशेष महत्त्व आहे. या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज केला जातो. तुम्हीही कोणाला प्रपोज करायचे ठरवले आहे? अशातच तुम्हाला खालील मसेज, फोटो समोरच्या व्यक्तीला इम्प्रेस करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला एकमेकांबद्दल खात्री असेल तर प्रपोज डे हा तुमचे नाते पुढे नेण्यासाठी उत्तम वेळ आहे. सोशल मीडियावर पार्टनरला हॅप्पी प्रपोज डेच्या शुभेच्छा देऊन तुम्ही हा दिवस आणखी खास बनवू शकता. 

१) तुझ्या प्रेमात पडून मी जगापेक्षा वेगळा ठरलो आहे, मला तुझ्याबरोबर म्हातारे व्हायचे आहे. हॅप्पी प्रपोज डे!

Propose Day is the second day of the Valentine's Week.
Propose Day is the second day of the Valentine's Week. (HT Photo)

२) माझे कालही तुझ्यावर प्रेम होते, आजही तुझ्यावर प्रेम आहे आणि उद्याही माझे फक्त तुझ्यावरच प्रेम असेल. मी कायम तुझ्यासोबत राहीन, असे वचन देतो. हॅप्पी प्रपोज डे.

३) मी तुला पहिल्यांदा पाहिलं आणि तेव्हापासून तुझ्या प्रेमात पडलो. तूच माझी जीवनसाथी आहेस, हे तेव्हा मला तेव्हाच कळाले. माझ्या आयुष्यात येऊन माझे जग सुंदर बनवल्याबद्दल मी तुझा आभारी आहे. हॅप्पी प्रपोज डे.

On Propose Day, people confess their romantic feelings to a potential partner.
On Propose Day, people confess their romantic feelings to a potential partner. (HT Photo)

४) माझ्या बऱ्याच गोष्टींची कमी आहे, तरीही तू मला स्वीकारले आणि माझ्यासोबत राहणे पसंत केले आहे. मी तुझ्यावर कायम प्रेम करेन. हॅप्पी प्रपोज डे.

५) तूच माझ्या आयुष्यातील संगीत आहेस. तुझ्यामुळे अनेक गोष्टी सुंदर झाल्या आहेत. तुझ्या चेहऱ्यावर फुलणारे हास्य मी कधीच थांबू देणार नाही. 

Some people also pop the big question to their lover or ask someone they adore to be their partner.
Some people also pop the big question to their lover or ask someone they adore to be their partner. (HT Photo)

६) आज, मी आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करीत राहीन असे वचन देतो. हॅप्पी प्रपोज डे.

७) मी वचन देतो की मी तुला कायम जपेन आणि तुझ्यावर प्रेम करीत राहीन. मी वचन देतो की, तुमचे जीवन आनंदाने भरून टाकेन आणि अडचणीच्या वेळी तुमच्या पाठीशी राहील. मी तुझ्यावर प्रेम करतो, हॅप्पी प्रपोज डे.

Make the day extra special with these beautiful wishes.
Make the day extra special with these beautiful wishes. (HT Photo)

८)  माझेआयुष्य अर्थपूर्ण आणि सुंदर बनवले आहे. हॅप्पी प्रपोज डे.

९) उरलेलं आयुष्य तू माझ्यासोबत शेअर करशील का? मी वचन देतो की, आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने आणि प्रेमाने जगू, हॅप्पी प्रपोज डे!

Happy Propose Day to you and your partner!
Happy Propose Day to you and your partner! (HT Photo)

Ashwjeet Jagtap

TwittereMail

अश्वजीत जगताप हिंदुस्तान टाइम्स मराठीमध्ये सीनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहे. अश्लजीत येथे राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स, टेक्नोलॉजी, ऑटो, व्हायरल न्यूज आणि करिअर संबंधित बातम्या लिहितो. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात एकूण ५ वर्षांचा अनुभव आहे. यापूर्वी लेटेस्टली- मराठी (डिजिटल), एबीपी माझा (डिजिटल) मध्ये कामाचा अनुभव. अश्वजीतला क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळणे आणि बायोपिक चित्रपट पाहायला आवडतात.

Whats_app_banner