मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Promise Day 2024 Wishes: प्रॉमिस डेला पार्टनरला द्या हे प्रेमळ वचन, पाठवा हे सुंदर मॅसेज

Promise Day 2024 Wishes: प्रॉमिस डेला पार्टनरला द्या हे प्रेमळ वचन, पाठवा हे सुंदर मॅसेज

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 11, 2024 09:28 AM IST

Happy Promise Day 2024: फेब्रुवारी महिना लव्हर्ससाठी खास असतो. व्हॅलेंटाईन वीक सुरु असून ११ फेब्रुवारीला प्रॉमिस डे साजरा केला जातो. तुम्ही या कविता, कोट्सद्वारे पार्टनरला आयुष्यभर सोबतच राहण्याचे वचन देऊ शकता. पाहा हे बेस्ट मॅसेज.

प्रॉमिस डेच्या शुभेच्छा मॅसेज
प्रॉमिस डेच्या शुभेच्छा मॅसेज (freepik)

Promise Day Wishes, Quotes, Messages: व्हॅलेंटाईन वीक कपल्ससाठी एखाद्या सणापेक्षा कमी नसतो. व्हॅलेंटाईन वीकच्या पाचव्या दिवशी प्रॉमिस डे साजरा केला जातो. ११ फेब्रुवारीला साजरा होणारा हा दिवस कपल्ससाठी खूप खास आहे. आहे. या दिवशी कपल्स एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याचे वचन देतात. ही वचने तुमचे नाते आणखी मजबूत करतात. प्रॉमिस डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरला हे प्रेमळ वचने देऊ शकता. या खास दिवसासाठी हे सुंदर मॅसेज, कोट्स पाहा.

आजन्म साथ देशील असे वचन दे मला

नेहमीच पदोपदी खुश ठेवीन मी तुला

सोडून कधी जाऊ नकोस तू मला

मी आयुष्यभर साथ देईल तुला

Happy Promise Day!

 

तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण

प्रत्येक वेळी येते तुझी आठवण

राहू दे सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर

हेच प्रॉमिस करुया एकमेकांना आपण

Happy Promise Day!

प्रत्येक जन्मी तुझ्यासारखी व्यक्ती आयुष्यात मला लाभो

असाच प्रेमाचा वर्षाव सदैव माझ्या आयुष्यात करत राहो

पावलांवर पाऊल ठेवत येईल तुझ्यापाशीच

अन् एका क्षणात मिठीत विरुन जाशील माझ्यापाशीच

Happy Promise Day!

 

एक प्रॉमिस माझ्याकडून

जेवढे सुख तुला देता येईल

तेवढे देईल

काहीही झाले तरी

मी शेवटपर्यंत साथ मात्र तुलाच देईल

Happy Promise Day!

वाऱ्याची कोमल झुळुक म्हणून

माझ्या आयुष्यात आलीस

मला प्रेमाच्या नशेत

बुडवून तू गेलीस

तूच दिसते मला आता सर्वत्र

साथ हवी आहे मला आता तुझी आजन्म

Happy Promise Day!

 

तुझा हात जो आता कायम धरला आहे

तो कधीही न सोडण्यासाठी

Happy Promise Day!

 

समुद्राच्या लाटेप्रमाणे माझ्यासोबत सदैव तरंग रहा

सुर्यास्तासारखा विश्वास माझ्यावर ठेवत रहा

येतील नवे अनेक दिवस आपल्या आयुष्यातही

ज्यात तूच असशील प्रकाशाची वाट माझ्यासाठीच

Happy Promise Day!

वचन दे आयुष्यभरासाठी की

तू सदैव माझ्यापाशी राहशील

कोणत्याही सुख-दुःखात तू साथ माझी देशील

कधीही आयुष्यात मागे पडलो तरीही

तुच मला समजून घेशील

Happy Promise Day!

 

तू माझ्यासाठी बेस्ट आहेस

त्यामुळे तू कायम माझ्यासोबत रहा

आपण दोघे मिळून पृथ्वीवर स्वर्ग बनवू

Happy Promise Day!

तू दिलेले वचन खोट आहे,

असे कधीच समजणार नाही

आजही तुझी वाट बघतोय

आणि उद्याही बघणार

तुला विसरून जाणे

मला कधीच जमणार नाही

Happy Promise Day!

WhatsApp channel