National Best Friends Day 2024: आपल्या 'बेस्ट फ्रेंड'ला द्या खास शुभेच्छा! स्टेट्‍सला ठेवण्यासाठी परफेक्ट आहेत हे मॅसेज
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  National Best Friends Day 2024: आपल्या 'बेस्ट फ्रेंड'ला द्या खास शुभेच्छा! स्टेट्‍सला ठेवण्यासाठी परफेक्ट आहेत हे मॅसेज

National Best Friends Day 2024: आपल्या 'बेस्ट फ्रेंड'ला द्या खास शुभेच्छा! स्टेट्‍सला ठेवण्यासाठी परफेक्ट आहेत हे मॅसेज

Published Jun 07, 2024 04:46 PM IST

Happy National Best Friends Day 2024: नॅशनल बेस्ट फ्रेंड्स डे ८ जून रोजी आहे. या शुभेच्छा, इमेज, कोट्स, मॅसेज तुम्ही तुमच्या बेस्ट फ्रेंडला पाठवू शकता. तसेच व्हॉट्सअॅप आणि फेसबुक स्टेटस ठेवू शकता.

नॅशनल बेस्ट फ्रेंड्स डे २०२४ - शुभेच्छा, मॅसेज, कोट्स
नॅशनल बेस्ट फ्रेंड्स डे २०२४ - शुभेच्छा, मॅसेज, कोट्स (HT Photo)

National Best Friends Day Wishes, Quotes and Messages: नॅशनल बेस्ट फ्रेंड्स डे दरवर्षी ८ जून रोजी साजरा केला जातो. अमेरिकेतील लोक दरवर्षी हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात. आपल्या जिवलग मित्रांसोबत असलेले विशेष नाते साजरे करण्यासाठी समर्पित असलेला हा दिवस अशा मित्रांचा सन्मान करतो आणि त्यांचे कौतुक करतो जे आपल्या आयुष्यात आनंद, आधार आणि हास्य आणतात. लोक या दिवशी आपल्या जिवलग मित्रांना गिफ्ट पाठवून, प्लॅन करून, सरप्राईज देऊन कृतज्ञता व्यक्त करतात. तुम्ही तुमच्या बेस्ट फ्रेंडला हे खास संदेश पाठवून हा दिवस आणखी खास बनवू शकता. तुमच्या बेस्ट फ्रेंडच्या चेहऱ्यावर ते नक्कीच हास्य फुलवतील. वाचा काही खास शुभेच्छा संदेश, कोट्स.

नॅशनल बेस्ट फ्रेंड्स डे शुभेच्छा
नॅशनल बेस्ट फ्रेंड्स डे शुभेच्छा (HT Photo)

हॅप्पी नॅशनल बेस्ट फ्रेंड्स डे २०२४ शुभेच्छा, इमेज, कोट्स, मॅसेज

नदीला आस असते पाण्याची

डोळ्यांना आस असते अश्रूंची

हृदयाला आस असते ठोक्यांची

आपल्या नात्याला आस तुझ्या मैत्रीची!

Happy National Best Friends Day!

नॅशनल बेस्ट फ्रेंड्स डे
नॅशनल बेस्ट फ्रेंड्स डे (HT Photo)

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,

आनंद दाखवायला हास्याची गरज नसते,

दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,

न बोलता ज्यामध्ये सारं समजते,

ती म्हणजे मैत्री असते...

नॅशनल बेस्ट फ्रेंड्स डेच्या शुभेच्छा!

 

मैत्री असावी मुक्त गाणाऱ्या पाखरांसारखी

मैत्रीचं नातं असतं नाजूक फुलासारखं

फुलणारं एकदा फुलल्यावर

आयुष्यभर गंध देणारं

Happy National Best Friends Day!

नॅशनल बेस्ट फ्रेंड्स डे २०२४
नॅशनल बेस्ट फ्रेंड्स डे २०२४ (HT Photo)

काही नाती बनत नसतात,

ती आपोआप गुंफली जातात,

मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात

काही जण हक्काने राज्य करतात,

त्यालाच तर मैत्री म्हणतात....

Happy National Best Friends Day!

 

हॅपी नॅशनल बेस्ट फ्रेंड्स डे
हॅपी नॅशनल बेस्ट फ्रेंड्स डे (HT Photo)

मैत्री असावी मना-मनाची,

मैत्री असावी जन्मो-जन्माची

मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची

अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी....

नॅशनल बेस्ट फ्रेंड्स डेच्या शुभेच्छा!

नॅशनल बेस्ट फ्रेंड्स डेच्या शुभेच्छा
नॅशनल बेस्ट फ्रेंड्स डेच्या शुभेच्छा (HT Photo)

बंधनापलीकडे एक नाते असावे

शब्दांचे बंधन त्याला नसावे,

भावनांचा आधार असावा,

दुःखाला तिथे थारा नसावा

असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा

Happy National Best Friends Day!

नॅशनल बेस्ट फ्रेंड्स डे
नॅशनल बेस्ट फ्रेंड्स डे (HT Photo)

काही शब्द नकळत कानावर पडतात

कोणी दूर असूनही उगाच जवळ वाटतात

खरं तर ही मैत्रीची नाती अशीच असतात

आयुष्यात येतात आणि आयुष्यच बनून जातात....

Happy National Best Friends Day!

Whats_app_banner