मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  International Family Day wishes : घर असावं घरासारखं... जागतिक कुटुंब दिनी आप्तेष्टांना द्या 'या' खास शुभेच्छा

International Family Day wishes : घर असावं घरासारखं... जागतिक कुटुंब दिनी आप्तेष्टांना द्या 'या' खास शुभेच्छा

Aarti Vilas Borade HT Marathi
May 15, 2024 10:21 AM IST

International Family Day 2024 wishes : आज १५ मे रोजी जागतिक कुटुंब दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आपल्या कुटुंबातील व्यक्तींना शुभेच्छा द्यायच्या असतील तर खाली दिलेले मेसेज तुम्ही नक्की पाठवू शकता

जागतिक कुटुंब दिन संदेश
जागतिक कुटुंब दिन संदेश

Family Day Wishes In Marathi: भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंब पद्धतीला सर्वात जास्त महत्त्व दिले जात आहे. कुटुंबाशिवाय कोणतीही व्यक्ती ही पूर्ण होत नाही. कुटुंब हे प्रत्येक व्यक्तीचं सर्वस्व असते. पूर्वीच्या काळातील एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास होत असला तरी बदललेली कुटुंब पद्धत आजही सगळीकडे आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात हम दो हमारे दो असे म्हटले जाते. आजकालचे कपल मुलही नको असल्याचे म्हणतात. त्यामुळे या जागतिक कुटुंब दिनाचे महत्त्व सांगणे संदेश तुमच्या कुटुंबातील सदस्यांना नक्की पाठवा. कुटुंबातील सदस्यांशी नाते घट्ट करण्यासाठी खालील संदेश नक्की पाठवा...

ट्रेंडिंग न्यूज

> कुटुंब हे देवाने दिलेले असे गिफ्ट आहे, जे आयुष्यातील कोणत्याही वळणावर तुम्हाला निराश करणार नाही. कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

> घरात एकत्र राहणे म्हणजे कुटुंब नाही एकत्रित जगणे आणि सगळ्यांची पर्वा करणे याला कुटुंब म्हणतात Happy Family Day!!
वाचा: केस खूप कोरडे झालेत का? केसांना सॉफ्ट आणि चमकदार बनवण्यासाठी लावा या २ गोष्टी

> ताकद आणि पैसा हे जीवनाचे फळ आहे, परंतु एकत्र कुटुंब हे जीवनाचे खरे मूळ आहे! Happy Family Day!!

> कुटुंब म्हणजे व्यक्तीचा आधारस्तंभ असतो, कुटुंबाशिवाय जगण्याला अर्थ उरत नाही, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा आदर करायलाच पाहिजे, कुटुंबातील प्रत्येकाशी प्रेमाने वागलेच पाहिजे... जागतिक कुटुंब दिनाच्या मनापासून खुप खुप शुभेच्छा...
वाचा: घाम न गाळता किचनमधील चिकट व तेलकट डबे कसे निघणार स्वच्छ? जाणून घ्या सोप्या टीप्स

> कुटुंब म्हणजे केवळ रक्ताचे नाते नाही, तुम्हाला गरज असताना व आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब जागतिक कुटुंब दिनाच्या शुभेच्छा...

> आपली सर्वात मोठी शाळा म्हणजे आपले स्वत:चे कुटुंब होय, जागतिक कुटुंब दिनाच्या शुभेच्छा...
वाचा: १० फ्लॉप चित्रपटांनंतर राजकुमारचा 'श्रीकांत' ठरतोय हिट, जाणून घ्या चौथ्या दिवसाची कमाई

काय आहे इतिहास?

जागतिक कुटुंब दिवस हा दिवस १९९४ साली संयुक्त राष्ट्र संघाने साजरा करण्यास सुरुवात केली. या दिवसाच्या माध्यमातून लोकांना कुटुंबांचे महत्त्व समजावे या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी १५ मे रोजी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जात आहे. या खास प्रसंगी, तुम्हालाही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना कौटुंबिक दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील, तर वरील संदेश (Facebook, WhatsApp Status, HD Images, Quotes, massage) नक्की पाठवा..

WhatsApp channel

विभाग