Happy Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीला आपल्या मुलांना नक्की सांगा बाप्पा संबंधित 'या' गोष्टी, आयुष्यात मिळेल यश-happy ganesh chaturthi 2024 tell your children the mythological stories of lord ganesha ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Happy Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीला आपल्या मुलांना नक्की सांगा बाप्पा संबंधित 'या' गोष्टी, आयुष्यात मिळेल यश

Happy Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीला आपल्या मुलांना नक्की सांगा बाप्पा संबंधित 'या' गोष्टी, आयुष्यात मिळेल यश

Sep 07, 2024 03:58 PM IST

Happy Vinayaka Chaturthi 2024: लहान-लहान मुलांना फार काही कळत नाही पण बाप्पाच्या स्वागतासाठी केलेली तयारी आणि मिठाई पाहून त्यांना आनंद होतो. अशा परिस्थितीत, एक जबाबदार पालक म्हणून, मुलांना गणपती बाप्पाबद्दल सांगण्याची हीच योग्य वेळ आहे.

गणेश चतुर्थीला मुलांना सांगा बाप्पा संबंधित 'या' गोष्टी
गणेश चतुर्थीला मुलांना सांगा बाप्पा संबंधित 'या' गोष्टी (Shutterstock)

Teach children these qualities of Ganapati Bappa: गणेश चतुर्थीनिमित्त देशभरात आनंदाचे वातावरण आहे. घरोघरी बाप्पाचे अगदी थाटामाटात स्वागत झाले आहे. या सणासुदीच्या वातावरणात मुलांमध्ये एक वेगळाच उत्साह असतो. लहान-लहान मुलांना फार काही कळत नाही पण बाप्पाच्या स्वागतासाठी केलेली तयारी आणि मिठाई पाहून त्यांना आनंद होतो. अशा परिस्थितीत, एक जबाबदार पालक म्हणून, मुलांना गणपती बाप्पाबद्दल सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. मुलांना त्यांच्या आदर्शांची आणि गुणांची ओळख करून द्या जेणेकरून ते भविष्यात एक चांगली व्यक्ती बनू शकतील. आज आम्ही तुम्हाला गणपती बाप्पाच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्ही तुमच्या मुलांसोबत शेअर केल्यास उत्तम होईल.

कोणत्याही परिस्थितीत आपल्या पालकांचा आदर करा-

श्रीगणेश आपल्या आई-वडिलांनाच आपलं संपूर्ण जग समजत होते. याच्याशी संबंधित एक पौराणिक कथादेखील आहे. असे म्हणतात की, एकदा गणेशजी आणि त्यांचे बंधू कार्तिकेय यांच्यात त्यांच्यापैकी महान कोण यावरून वाद झाला होता? जेव्हा हे प्रकरण पुढे वाढले तेव्हा दोघांनाही सांगण्यात आले की, संपूर्ण जगाला प्रदक्षिणा घालून जो पहिला येईल तो सर्वात मोठा असेल. गणेशजी आईवडिलांना प्रदक्षिणा घालत बसले. म्हणाले की ,तुम्ही दोघे माझे संपूर्ण जग आहात. तेव्हापासून गणेशजींना प्रथम देवाचा दर्जा प्राप्त झाला. या कथेद्वारे मुलांना सांगा की, आयुष्यात त्यांच्या आई-वडिलांपेक्षा कोणीही मोठे नाही. आईवडीलच असे आहेत की ज्यांना आपल्या मुलांना नेहमी आनंदात आणि यशस्वी पाहायचं आहे.

जे तुमच्यापेक्षा कमजोर आहेत त्यांच्याशी भेदभाव करू नका-

गणेशजी सर्वांना समान समजत असत. त्यांनी कधीही उच्च-नीच असा भेदभाव केला नाही. गरीब आणि दुर्बलांना कधीही हीन समजले नाही. ते सर्वांना समान मानत असे. पालकांनी आपल्या मुलांना हे शिकवावे की गणपती बाप्पाप्रमाणे मुलांनीही कोणाशीही भेदभाव करू नये. सर्वांना सन्मानाने वागवावे.

आयुष्यात हार मानू नका-

मुलांना गणपती बाप्पाच्या जीवनातून कधीही हार न मानण्याची शिकवण दिली पाहिजे. गणेशजींनी आयुष्यात कधीही हार स्वीकारली नाही. याच्याशी संबंधित एक पौराणिक कथादेखील आहे. असे म्हणतात की, एकदा श्रीगणेश काहीतरी लिहायला बसले होते. लिहिताना त्यांची लेखनी तुटली. पण गणेशजींनी हार मानली नाही, त्यांनी त्यांचा एक दात तोडला आणि त्याने लिहायला सुरुवात केली. श्रीगणेशाच्या जीवनातील कधीही हार न मानण्याची वृत्ती मुलांना जीवनाच्या प्रत्येक वळणावर खूप उपयोगी पडेल. या शिकवणीने मुले आयुष्यात कधीही निराश होणार नाहीत. आणि कुठे अडखळली तरी हार मानण्याऐवजी ते धैर्याने परिस्थितीला सामोरे जातील.

आयुष्यात स्थैर्य आवश्यक आहे-

श्रीगणेशाच्या आत खूप स्तब्धता होती. त्यामुळे तुम्हीही मुलांना सांगा की, आयुष्यात स्थैर्य खूप महत्वाचे आहे. घाईगडबडीत कधीच कोणतेही काम होत नाही. उलट काम बिघडते. यामध्ये विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्तीही नाहीशी होते. जेव्हा मनात स्थिरता असते तेव्हा प्रत्येक परिस्थितीत विचार करण्याच्या आणि समजून घेण्याच्या क्षमतेवर कोणताही प्रभाव पडत नाही. ज्यामुळे कठीण प्रसंगातून मार्ग काढणे सोपे जाते. त्यामुळे मुलांना श्रीगणेशाच्या जीवनातून मनात स्थैर्य आणण्यास शिकवले पाहिजे.

Whats_app_banner