Ganesh Chaturthi 2024 : कधी मोदक फाटतात तर कधी कडक होतात? परफेक्ट बनवण्यासाठी शेफ संजीव कपूरच्या टिप्स करा फॉलो-happy ganesh chaturthi 2024 follow chef sanjeev kapoors tips to make the perfect ukdiche modak ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ganesh Chaturthi 2024 : कधी मोदक फाटतात तर कधी कडक होतात? परफेक्ट बनवण्यासाठी शेफ संजीव कपूरच्या टिप्स करा फॉलो

Ganesh Chaturthi 2024 : कधी मोदक फाटतात तर कधी कडक होतात? परफेक्ट बनवण्यासाठी शेफ संजीव कपूरच्या टिप्स करा फॉलो

Sep 07, 2024 09:11 AM IST

Ganesh Chaturthi 2024: बऱ्याचवेळा मोदक बनवताना, ते परफेक्ट होत नाहीत. कधी हे मोदक फाटतात तर कधी कडक बनतात. तर कधी सारणच सैल होते. अशी समस्या अनेकदा उद्भवते.

उकडीचे मोदक परफेक्ट बनवण्यासाठी टिप्स
उकडीचे मोदक परफेक्ट बनवण्यासाठी टिप्स

Chef Sanjeev Kapoor Modak Recipe: गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात. म्हणूनच गणेशोत्सवात मोदक प्रसाद म्हणून दिले जातात. मात्र, सर्वसामान्यांनाही मोदक खायला आवडतात. काहींना गणेशोत्सवाव्यतिरिक्त सामान्य दिवसातही मोदक बनवायला आवडते. मोदक अनेक प्रकारे बनवता येतात. परंतु ते परिपूर्ण कसे बनवायचे हे फार कमी लोकांना माहिती आहे.

बऱ्याचवेळा मोदक बनवताना, ते परफेक्ट होत नाहीत. कधी हे मोदक फाटतात तर कधी कडक बनतात. तर कधी सारणच सैल होते. अशी समस्या अनेकदा उद्भवते. तुम्हालाही मोदक खूप आवडत असतील आणि ते घरी बनवायचे असतील, तर तुम्ही शेफ संजीव कपूर यांच्या या टिप्स फॉलो करू शकता. संजीव कपूर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर या टिप्स शेअर केल्या आहेत. यामध्ये त्यांनी मोदक परफेक्ट बनवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे सांगितले.

उकडीच्या मोदकासाठी उत्तम तांदूळ-

आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात. पण तुम्ही पहिल्यांदाच बनवणार असाल, तर जास्त प्रयोग करण्यापेक्षा सोपी पद्धत वापरून पहा. यासाठी सुवासिक बासमती तांदळाचे पीठ मोदकांसाठी योग्य आहे. सारणामध्ये भेसळ नसलेला शुद्ध गूळ वापरण्याचा प्रयत्न करा.

मळलेले कणिक झाकून ठेवा-

मोदकासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कणिक होय. यासाठी जेव्हा जेव्हा तुम्ही मोदकाचे पीठ तयार करता, तेव्हा ते बाहेर उघड्यावर ठेवू नका, यामुळे ते लवकर सुकते आणि घट्ट होते. पीठ तयार केल्यानंतर, तुम्ही ते मऊ कपड्यात गुंडाळून ठेवू शकता. पीठ सुकले तर मोदकाची चवच खराब होईल असं नाही तर त्याला आकार देणेही कठीण होऊ शकतं. त्यामुळे कणिक झाकून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

कणिक मऊ मळा-

मोदकासाठी पीठ तयार करताना लक्षात ठेवा की, ते मऊ पण घट्ट असावे. पीठ मऊ आहे की नाही हे तुम्ही तपासू शकता. यासाठी मोदकांना आकार देताना किंवा भरताना तो फुटणार नाही याची काळजी घ्या. जर मोदक फाटले तर याचा अर्थ पीठ आणखी मळून घ्यावे लागेल. त्यामुळे पीठ मळताना विशेष काळजी घ्या.

मोदक कसे वाफवायचे-

मोदक वाफवताना अनेकदा ते स्टीमरला चिकटू लागतात. मोदक स्टीमर प्लेटला चिकटू नयेत म्हणून बेस पाण्यात बुडवा. यासाठी मोदक स्टीमरमध्ये टाकण्यापूर्वी त्याचा बेस पाण्यात बुडवून घ्या. जेणेकरून ते प्लेटला चिकटणार नाहीत.

मोदक अशाप्रकारे करा चेक-

मोदक नीट वाफवलेले आहेत की नाही, हे दोन प्रकारे तपासता येते. पहिला मोदक तयार झाला की तो चमकू लागतो. दुसरे म्हणजे जेव्हा तुम्ही ते उचलता तेव्हा ते तुमच्या बोटांना चिकटू नये. अशाप्रकारे तुम्ही मोदक उकडलेत की नाही ते पाहू शकता.

Whats_app_banner