Happy engineers day : आज इंजिनिअर्स डे! तुमचे इंजिनीअर मित्र व नातलगांना शुभेच्छा द्या, हे खास संदेश पाठवा!-happy engineers day 2024 is being celebrated today give these special wishes to your loved ones ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Happy engineers day : आज इंजिनिअर्स डे! तुमचे इंजिनीअर मित्र व नातलगांना शुभेच्छा द्या, हे खास संदेश पाठवा!

Happy engineers day : आज इंजिनिअर्स डे! तुमचे इंजिनीअर मित्र व नातलगांना शुभेच्छा द्या, हे खास संदेश पाठवा!

Sep 15, 2024 10:46 AM IST

Engineers Day Quotes: अभियंता दिवस आपल्याला तांत्रिक नवकल्पना आणि अभियांत्रिकीच्या मदतीने आपण आगामी आव्हाने कशी सोडवू शकतो याची आठवण करून देतो.

Happy engineers day 2024
Happy engineers day 2024 (freepik)

Who was Dr. Visvesvaraiya:  अभियंता दिनाचे उद्दिष्ट विद्यार्थी आणि तरुणांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये करिअर करण्यासाठी प्रेरित करणे हा आहे. अभियंता दिवस आपल्याला तांत्रिक नवकल्पना आणि अभियांत्रिकीच्या मदतीने आपण आगामी आव्हाने कशी सोडवू शकतो याची आठवण करून देतो. १९६२ मध्ये एम. विश्वेश्वरैय्या सरांच्या निधनानंतर, त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी १५सप्टेंबर ह अभियंता दिवस म्हणून घोषित करण्यात आला होता.इंजिनिअर्स मित्र-मैत्रिणींना प्रोत्साहन देण्यासाठी हे शुभेच्छा संदेश तुम्हाला मदत करतील...

 

  • इंजिनिअर्स डे शुभेच्छा

 

-प्रत्येकजण अभियंता आहे, काही घरे बांधतात, काही सॉफ्टवेअर बनवतात, 

काही मशीन बनवतात, आणि आमच्यासारखे लोक त्यांच्या कथा सांगतात, 

त्यांच्याविषयी लिहून त्यांना अमर करतात! 

अभियंता दिनाच्या शुभेच्छा!!!

 

-“लहानपणी खेळणी फोडून जोडणारी मुलेच… 

मोठे होऊन ते इंजिनिअर होतात. 

मेटलर्जिकल अभियंता दिनाच्या शुभेच्छा”

 

-४ वर्ष

४० विषय

४०० प्रयोग

४००० असाइनमेंट

४०००० तास

एक सामान्य माणूस हे करू शकत नाही.

त्या सुपरहिरोना म्हणतात 'इंजिनियरिंग स्टुडंट्स'

अभियंता दिनाच्या शुभेच्छा!!

-आधुनिक भारताचे विश्वकर्मा अशी ओळख असलेल्या

भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त

त्यांना कोटी-कोटी प्रणाम,

त्यांच्या जयंतीनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

-भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

Happy Engineers Day!

 

-अनेक असाध्य गोष्टी साध्य करण्यासाठी झटतात ते इंजिनियर्स,

कल्पनांना सत्यात उतरवतात ते इंजिनियर्स…

Happy Engineer's Day!!

 

-सगळे म्हणतात अभियांत्रिकी हे अगदी सोपे,

पण जे अभियंता झालेत त्यांना विचारा,

अभियंता दिनानिमित्त सर्वाना खूप साऱ्या शुभेच्छा!!!

Whats_app_banner
विभाग