Chocolate Day 2025 Wishes In Marathi : सध्या सगळीकडेच 'व्हॅलेंटाईन डे'चा फीव्हर आहे. प्रेमात पडलेली तरूणाई व्हेलेंटाईन डे साजरा करण्यापूर् हा संपूर्ण आठवडा साजरा करते. या व्हेलेंटाईन वीक मध्ये प्रेम, नातं यांच्याशी निगडीत एक खास दिवस साजरा केला जातो. ९ फेब्रुवारीला व्हेलेंटाईन वीकमध्ये 'चॉकलेट डे' साजरा केला जातो. चॉकलेट ही एक अशी गोष्ट आहे, जी आपला मूड चटकन लिफ्ट करू शकते. चॉकलेट डे सेलिब्रेशन लव्ह पार्टनरला चॉकलेट्स देऊन केलं जातं. व्हेलेंटाईन डे आणि सेलिब्रेशन म्हणजे गोड तर पाहिजेच. चॉकलेट शिवाय प्रेमाचं सेलिब्रेशन तसं अपूर्णच वाटू लागतं. पण, आता चॉकलेट्स अनेक स्वरूपात मिळतात. गोड प्रमाणेच कडू, व्हिगन, डाएट नुसारही चॉकलेट्स उपलब्ध आहेत. या खास दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरला चॉकलेटसोबत खास मेसेज देखील देऊ शकता.
प्रेम हे च्युंइंगम सारखं आहे,
ज्याचा गोडवा फक्त सुरूवातीलाच असतो,
मात्र, मैत्री चॉकलेटसारखी असते
कायमस्वरूपी गोडवा देणारी…
हॅपी चॉकलेट डे!
प्रेम हे सुंगधित,
मऊ आणि गोड असतं.
एका नजरेत चॉकलेटप्रमाणे वितळतं…
हॅपी चॉकलेट डे!
नातं चॉकलेटसारखं असावं,
कितीही भांडण झालं तरी
नात्यात कायम गोडवा ठेवणारं असावं
हॅपी चॉकलेट डे!
हृदय तुझे,
एका गोड चॉकलेटसारखे नाजूक,
त्यात तू एका ड्रायफ्रुटचा तडका
तूच आहेस माझ्या हृदयाचा तुकडा!
Happy Chocolate Day
गोड व्यक्तीसारखी नेहमी जवळ रहा,
आयुष्याचे मधुर गीत गात रहा,
नात्यातील गोडवा टिकून राहण्यासाठी,
चॉकलेट डेच्या शुभेच्छा स्वीकार करा!
हॅपी चॉकलेट डे!
Fruit And Nut चा स्वाद आहेस तू…
Five Star पेक्षाही खास आहेस तू…
Galaxy सारखी माझे आयुष्य आहेस तू!
हॅपी चॉकलेट डे!
माहित आहे मला
चॉकलेट खूप आवडते तुला
म्हणूनच 'चॉकलेट डे'च्या खूप खूप शुभेच्छा!
Happy Chocolate Day
मला हाक न मारता मी तुझ्या समोर येईन,
वचन दे असे की मैत्री तु सुद्धा निभावशील,
परंतु असे नाही फक्त रोज आठवण काढशील,
पण लक्षात ठेव जेव्हा तु एकट्यात चॉकलेट खाशील.
हॅपी चॉकलेट डे!
‘Five Star’ सारखी दिसतेस,
‘Munch’ सारखी लाजतेस,
‘Cadbury’ सारखी जेव्हा पण तू हसतेस,
‘Kit-Kat’ ची शपथ,
तेव्हा तू खूप सुंदर दिसतेस…
Happy Chocolate Day!
तुला पाहता क्षणी भुललो तुझ्या प्रेमात,
गोडवा आणि प्रेम राहो आपल्या नात्यात,
हवी ती चॉकलेट ठेवेल तुझ्या पुढ्यात
होकार कळव मला या क्षणात
चॉकलेट दिवसाच्या गोड गोड शुभेच्छा!
संबंधित बातम्या