Hanuman Jayanti Special Paneer Malpua Recipe: यावर्षी २३ एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी होणार आहे. या दिवशी विधीनुसार हनुमानाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे सांगितले जाते. या दिवशी भक्त हनुमानजींचा उपवासही ठेवतात. या दिवशी विधीनुसार पूजा करण्याबरोबरच हनुमानाला विविध वस्तू अर्पण केल्या जातात. बजरंग बलीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही या दिवशी पनीर मालपुआही प्रसाद म्हणून अर्पण करू शकता. ते घरी कसे बनवायचे ते जाणून घ्या.
- १०० ग्रॅम मलाई पनीर
- ३ टेबलस्पून खवा
- थोडे दूध
- साखर
- अर्धा चमचा वेलची पावडर
- २ टेबलस्पून मैदा
- १ कप तूप
- १/४ टीस्पून केशर
- १ चमचा ड्राय फ्रूट्स
पनीर मालपुआ बनवण्यासाठी प्रथम पनीरचे तुकडे, खवा आणि थोडे दूध यांचे मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून त्याचे बॅटर तयार करा. हे बॅटर इतके फेटून घ्या की जाड आणि गुळगुळीत द्रावण तयार होईल. आता एका बाउलमध्ये बॅटर घाला आणि त्यात पिठी साखर, वेलची पावडर आणि मैदा घाला. आवश्यक असल्यास आणखी थोडे दूध घाला आणि चांगले फेटून घ्या. आता मालपुआ बनवण्यासाठी कढईत तूप गरम करून त्यात एक चमचा बॅटर घालून दोन्ही बाजूंनी हलका तपकिरी होईपर्यंत शिजवा. सर्व मालपुआ तयार करून बाजूला ठेवा आणि पाक तयार करा.
यासाठी एका पातेल्यात साखर आणि पाणी टाका. साखर विरघळली की त्यात केशर घालून मिक्स करा. त्यात वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स घाला. थोडा वेळ उकळल्यानंतर त्यात मालपुआ घाला. हे १०- १५ मिनिटे पाकात बुडवून ठेवा. तुमचे पनीर मालपुआ प्रसाद म्हणून अर्पण करण्यासाठी तयार आहे.