Halim Seeds: वेट लॉस ते मासिक पाळी; महिलांच्या अनेक समस्यांवर गुणकारी आहेत अळीवाच्या बिया! वाचा याचे फायदे
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Halim Seeds: वेट लॉस ते मासिक पाळी; महिलांच्या अनेक समस्यांवर गुणकारी आहेत अळीवाच्या बिया! वाचा याचे फायदे

Halim Seeds: वेट लॉस ते मासिक पाळी; महिलांच्या अनेक समस्यांवर गुणकारी आहेत अळीवाच्या बिया! वाचा याचे फायदे

May 16, 2024 07:35 PM IST

Halim Seeds Benefits: हलीमाच्या बियांच्या सेवनाने शरीरातील अशक्तपणापासून ते अनियमित मासिक पाळी येण्यापर्यंतच्या अनेक समस्या नियंत्रित केल्या जाऊ शकतात. जाणून घेऊया हलीमच्या बियांचे गुणकारी फायदे...

वेट लॉस ते मासिक पाळी; महिलांच्या अनेक समस्यांवर गुणकारी आहेत हलीमच्या बिया!
वेट लॉस ते मासिक पाळी; महिलांच्या अनेक समस्यांवर गुणकारी आहेत हलीमच्या बिया!

Halim Seeds Benefits: गार्डन क्रेस सीड्स म्हणजेच हलीमाच्या बिया आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. हलीमच्या बियांना मराठीत अळीवाच्या बिया देखील म्हणतात. या बिया महिलांसाठी देखील खूप फायदेशीर आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बियांची चव खूपच छान असते. हलीमाच्या बिया सलाद, सूप आणि स्मूदी इत्यादींमध्ये वापरल्या जाते. विशेषतः महिलांनी हलीमच्या बिया जरूर खाल्ल्या पाहिजेत. हलीमाच्या बियांच्या सेवनाने शरीरातील अशक्तपणापासून ते अनियमित मासिक पाळी येण्यापर्यंतच्या अनेक समस्या नियंत्रित केल्या जाऊ शकतात. चला जाणून घेऊया हलीमच्या बियांचे गुणकारी फायदे...

हलीमच्या बियांमध्ये किती असते पोषण?

हलीमच्या बियांमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. १०० ग्रॅम हलीमच्या बियांमध्ये सुमारे ४०.३७ ग्रॅम फायबर असते आणि प्रोटीनचे प्रमाण २२.४ ग्रॅम असते. हलीमच्या बिया पोटॅशियम, फॉस्फरस, नियासिन, फॅट, कार्बोहाइड्रेट सोबतच हे व्हिटॅमिन एचा चांगला स्रोत आहेत. तर, यात लोहाचे प्रमाण ५ मिली ग्रॅम आहे. हलीमच्या बियांमध्ये फिलोल आणि फ्लेव्होनॉइड्स देखील भरपूर प्रमाणात असतात.

हलीमच्या बिया खाण्याचे फायदे

वजन कमी करण्यासाठी उत्तम: हलीमच्या बियांमध्ये फॅट आणि फायबर चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे या बिया खाल्ल्यास भूक कमी लागते आणि पोट बराच काळ भरलेले राहते. ज्यामुळे तुम्ही वारंवार भूक लागण्यापासून आणि अति खाण्यापासून दूर राहता. यातील प्रथिनांमुळे ते बॉडी मास इंडेक्स देखील संतुलित राखतात.

Paneer Bhurji Recipe: लंचसाठी बनवा अमृतसरी पनीर भुर्जी, पराठ्यासोबत टेस्टी लागते ही रेसिपी

रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर: हलीममधील फ्लेव्होनॉइड्स, अँटिऑक्सिडंट्स, फॉलिक ॲसिड, जीवनसत्त्वे ए, सी आणि ई यांच्या मदतीने शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. त्यामुळे व्यक्ती अनेक आजारांपासून दूर राहतो. या बियांमधून मिळणारी प्रतिकारशक्ती आजारपणातून लवकर बरे होण्यासाठी मदत करते.

अशक्तपणात फायदेशीर: जर एखाद्याला रक्ताची कमतरता किंवा ॲनिमियाचा त्रास असेल, तर त्याला हलीमच्या बिया खायला द्याव्यात. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी संतुलित राहते. शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हलीमच्या बियांसोबत व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून लोह शरीरात सहज शोषले जाऊ शकते. म्हणूनच स्त्रियांना अशक्तपणा दूर करण्यासाठी हलीमच्या बिया खाण्याचा सल्ला दिला जातो.

International Day of Light: का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

स्तनपान करणाऱ्या आईसाठी उपयोगी: स्तनपान करणाऱ्या मातांनी हलीमच्या बिया आवर्जून खाव्यात. त्यात प्रथिने आणि लोहासोबतच गॅलॅक्टॅगॉग गुणधर्म आढळतात, जे स्तनदा आईचे दूध वाढवण्यास मदत करतात.

बद्धकोष्ठता दूर करते: हलीमच्या बियांमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर असल्याने ते बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करतात. अपचन आणि पोटदुखीपासूनही आराम मिळतो.

मासिक पाळी नियमित करते: ज्या महिलांना अनियमित मासिक पाळी येण्याची समस्या असते. त्यांना हलीमच्या बियांमुळे आराम मिळू शकतो. या बियांमध्ये फायटोकेमिकल्स असतात, जे इस्ट्रोजेन हार्मोन्स म्हणून काम करतात आणि अनियमित मासिक पाळी नियमित करण्यात मदत करतात.

Whats_app_banner