Hair Oiling Hacks: केसांची मुळे मजबूत करण्यासाठी बरेच लोक तेल लावण्याचा सल्ला देतात. कधी कधी नारळ किंवा ऑलिव्ह सारख्या तेलांमध्ये इतर गोष्टी मिसळून तेल तयार केले जाते. ज्यामुळे केस गळण्याची समस्या कमी होऊ शकते. पण केसांना तेल लावताना झालेल्या चुकांमुळे तेलाचा प्रभाव कमी होतो. यामुळे फायदा होण्याऐवजी नुकसान होते आणि केस गळू लागतात. केसांना तेल लावण्यापूर्वी जाणून घ्या कोणत्या चुका करू नयेत.
जर तुम्ही आधीच केसांना तेल लावले असेल तर किंवा शॅम्पू करून बराच वेळ झाला असेल तर तेल लावणे पूर्णपणे टाळा. कारण घाणेरडे, तेलकट टाळूला पुन्हा तेल लावल्यास छिद्रे बंद होतात. तेव्हा केसांमधून तेल बाहेर पडत नाही आणि जास्त शॅम्पू केल्याने केसांचे नैसर्गिक तेल निघून जाते. ज्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात.
जर तुम्हाला कोंड्याची समस्या असेल तर केसांना तेल लावण्याची चूक करू नका. यामुळे कोंडा तेलाने टाळूला चिकटून राहतो आणि शॅम्पू केल्यानंतरही बाहेर येत नाही. जर टाळू तेलकट असेल तर कोंडा कमी होण्याऐवजी वाढेल आणि खाज जाणवेल.
केसांना तेल लावण्याचा नियम असा आहे की टाळू जितके तेल शोषून घेईल तेवढे तेल लावावे. केस ओले करण्याइतके तेल लावण्याची गरज नाही. तसेच केसांना तेल लावल्यानंतर दोन तासात शॅम्पूने केस धुवून घ्यावेत. अवघ्या एक ते दोन तासात तेल टाळूमध्ये सहज शोषले जातात. केसांमध्ये बराच वेळ तेल राहिल्याने केस घाणेरडे होतात आणि ते एकमेकांना घासल्यामुळे तुटू लागतात.
तेल लावल्यानंतर शॅम्पू करताना बरीच काळजी घ्यावी लागते. कारण टाळूवर तेल राहिल्यास केसांना घाण चिकटते आणि केस गळायला लागतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)