मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Mask: केस खूप कोरडे झालेत का? केसांना सॉफ्ट आणि चमकदार बनवण्यासाठी लावा या २ गोष्टी

Hair Mask: केस खूप कोरडे झालेत का? केसांना सॉफ्ट आणि चमकदार बनवण्यासाठी लावा या २ गोष्टी

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 14, 2024 12:13 PM IST

Hair Care Tips: तुटलेले, स्लिप्ट एंड, कोरड्या आणि रफ केसांचा तुम्हालाही त्रास होत असेल तर हे उपाय तुमच्यासाठी आहे. या टिप्स फॉलो करून तुम्ही सिल्की आणि स्मूथ केस मिळवू शकता. पाहा हे हेअर मास्क कसे बनवायचे.

केसांना सॉफ्ट आणि चमकदार बनवण्यासाठी हेअर मास्क
केसांना सॉफ्ट आणि चमकदार बनवण्यासाठी हेअर मास्क

Hair Mask for Soft and Shiny Hair: उन्हाळ्यात त्वचेसोबतच केसांशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. केस गळणे, कोंडा होणे आणि कोरडेपणा या केसांच्या समस्या सामान्य बनल्या आहेत. या समस्यांची योग्य वेळी काळजी घेतली नाही तर समस्या वाढू लागतात. केसांच्या समस्यांना तोंड देण्यासाठी तुम्ही बाजारात उपलब्ध असलेली महागडी हेअर केअर प्रोडक्ट वापरत असाल तर तुमचा खर्च वाचवा आणि केसांना सॉफ्ट आणि चमकदार बनवण्यासाठी हे हेअर मास्क वापरा. या दोन गोष्टींपासून बनणारे हे हेअर मास्क घरी बनवणे आणि लावणे खूप सोपे आहे. याच्या काही वापरातच तुम्हा परिणाम दिसून येईल. हे हेअर मास्क लावल्याने तुम्हाला सॉफ्ट आणि चमकदार केस मिळतील. चला तर मग जाणून घ्या कोणते आहेत हे हेअर मास्क आणि ते कसे बनवावे.

ट्रेंडिंग न्यूज

एलोवेरा जेल

एलोवेरा म्हणजेच कोरफड केसांसाठी खूप फायदेशीर आहे. हे केसांना कोंडापासून वाचवण्यासोबतच केसांना रेशमी बनवते. यामध्ये असलेले अमीनो ॲसिड आणि प्रोटीयोलाइटिक एन्झाईम केसांची मुळे मजबूत करतात. ते लावण्यासाठी कोरफडीचे पान घ्या. नंतर त्याचे जेल एका कपमध्ये काढून घ्या. त्यात दोन चमचे एरंडेल तेल मिक्स करा. आता त्याच प्रमाणात मेथी पावडर टाकून मिश्रण तयार करा. हे सर्व नीट मिक्स करून घ्या. आता हे मिश्रण केसांची लांबी आणि टाळूवर नीट लावा. काही वेळ ठेवल्यानंतर शॅम्पू करा.

दही लावा

दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक केसांच्या कूपांना मजबूत करते आणि केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. दह्याच्या वापराने केसांची मुळे मजबूत होतात आणि कोंडाही दूर होतो. हे लावण्यासाठी एक कप दही घ्या. त्यात सुमारे दोन चमचे आवळा पावडर मिक्स करा. हे नीट मिक्स केल्यानंतर हे मिश्रण केसांवर आणि टाळूवर नीट लावून घ्या. साधारण अर्धा तास राहू द्या. नंतर केस शॅम्पूने स्वच्छ करा. याचा वापर केल्यास केसांच्या अनेक समस्या दूर होतील.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel