Best Things For Hair Growth: धूळ, माती, प्रदूषण, घाम यासारख्या गोष्टींमुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. त्यामुळे ते खूप जास्त तुटायला आणि गळायला लागतात. त्यामुळे केसांची वाढही थांबते. अशा परिस्थितीत बहुतेक लोकांना प्रश्न पडतो की केस नैसर्गिक पद्धतीने वाढवता येतात का? तर होय, काही गोष्टींचा नियमित वापर केल्यास केस वाढण्यास मदत होते. जाणून घ्या लांब आणि दाट केसांसाठी काय करावे
ज्यांना लांब केस हवे आहेत त्यांनी कोमट खोबरेल तेलाने टाळूची मालिश करावी. ते रात्रभर तसेच राहू द्या. नंतर सकाळी केस धुवा.
कांदा बारीक करून त्याचा रस काढा. हा रस टाळूला लावा. साधारण ३० मिनिटे राहू द्या आणि नंतर केस धुवा. कांद्याच्या रसामध्ये सल्फर असते, जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते.
फ्रेश एलोवेरा जेल थेट तुमच्या टाळूवर लावा आणि धुण्यापूर्वी सुमारे एक तास तसंच राहू द्या. कोरफडमध्ये एन्झाईम्स असतात जे केसांच्या कूपांना चालना देऊ शकतात.
केसांची ग्रोथ वाढवण्यासाठी रोझमेरी, पेपरमिंट आणि लॅव्हेंडरसारखे तेल जोजोबा किंवा बदामाच्या तेलात मिक्स करा. हे रक्त प्रवाह सुधारतात आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. हे तेल नीट मिसळल्यानंतर आपल्या टाळूची मालिश करा.
अंड्यामध्ये प्रथिने आणि बायोटिन भरपूर प्रमाणात असते, जे केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. ते लावण्यासाठी अंडे फेटून केस आणि टाळूला लावा. नंतर ते २० मिनिटे राहू द्या. नंतर थंड पाण्याने केस धुवा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)