Simple Remedies To Stop Hair Fall: जगात कोणत्याही ठिकाणी गेला तरी तेथील स्त्रिया सौंदर्याच्या बाबतीत नेहमीच सजग असतात. काळानुसार सौंदर्याच्या संकल्पना बदलल्या आहेत. महिला सुंदर दिसण्यासाठी विविध आभूषणे, वस्त्रे, सौंदर्य प्रसाधने यांचा वापर करत असते. तर काही स्त्रिया सिंपल राहण्यातच आपले सौंदर्य असल्याचे मानतात. या सर्वांमध्ये एक गोष्ट अशी आहे जी स्त्रियांच्या सौंदर्यात भर पाडते. ती गोष्ट म्हणजे त्यांचे केस. प्रत्येक महिला आपल्या केसांबाबत अत्यंत संवेदनशील असतात. अनेक महिला केसगळत असल्याने डॉक्टरांकडे धाव घेतात. फक्त लांबलचक केस असून उपयोग नसतो. तर आपले केस निरोगी असणे आवश्यक असते. आज आपण केसगळती आणि त्यावर उपाय याबाबत जाणून घेणार आहोत.
सध्याच्या काळात स्त्रिया किंवा मुली आपल्या केसांवर विविध प्रयोग करत असतात. सतत कलरिंग करणे, केराटिन करणे, विविध हेअरकट करणे, हार्ड केमिकल्स असलेल्या शॅम्पू वापरणे या सर्व कारणांमुळे केसांवर प्रचंड परिणाम होतो. अशा स्थितीत केस गळणे, फाटे फुटणे, केस अकाली पांढरे होणे, रुक्ष पडणे, केसांची वाढ खुंटणे असे प्रकार घडतात. त्यामुळे आपले केस लहान असो किंवा मोठे त्याला निरोगी ठेवणे त्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक असते. आयुर्वेदात केसांसाठी काही गोष्टी सुचविण्यात आल्या आहेत. या गोष्टी नैसर्गिक असल्याने त्यांच्या केसांवर त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. शिवाय केस निरोगी राहतात आणि केस गळणे मोठ्या प्रमाणात कमी होते.
आज आम्ही तुम्हाला एक अशा औषधीय वनस्पतीबाबत सांगणार आहोत, ज्याच्या उपयोगाने तुमचे केस गळण्याचे तर थांबतीलच शिवाय वेगाने वाढतील. प्राचीन काळापासून ही वनपस्ती वापरली जात आहे. याचा उपयोग विविध औषधांमध्ये, सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. ही वनस्पती दुसरी कोणती नसून 'ब्राह्मी' होय. ब्राह्मीला प्राचीन काळापासून वैद्यकीय क्षेत्रात विशेष महत्व आहे. याच्या वापराने आरोग्य तर उत्तम राहतेच. शिवाय तुमच्या केसांच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. तुमचे केस रुक्ष, पातळ असतील तर त्यावर ब्राह्मी लाभदायक ठरू शकते.
प्राचीन काळापासून केसांसाठी ब्राह्मी वापरण्याचा सल्ला वैद्य देतात. आतासुद्धा आयुर्वेद क्षेत्रात केसांच्या समस्यांवर ब्राह्मी वापरण्यास सांगितले जाते. केसांसाठी आवश्यक असणारे खनिज तत्वे, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे ब्राह्मीमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. ब्राह्मीतील या घटकांमुळे तुमच्या केसांना हवे असलेले पोषण मिळते. दुभंगलेले केस, पातळ, रुक्ष केस, शिवाय केस गळती अशा विविध समस्यांवर ब्राह्मी मदत करते. शिवाय ब्राह्मीच्या वापराने तुमचे केस मजबूत होऊन वेगाने वाढतात.
सध्या मार्केटमध्ये ब्राह्मीचे अनेक प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. मात्र शक्य असल्यास नैसर्गिकरित्या ब्राह्मीचा वापर करणे जास्त लाभदायक ठरते. बाजारात किंवा आयुर्वेदिक मेडिकल्समध्ये ब्राह्मी उपलब्ध होते. ब्राह्मीची पेस्ट करून ती डोक्यावर लावल्यास केसांना पोषण मिळते. शिवाय ब्राह्मीची पेस्ट मेहंदीत मिक्स करून लावल्यानेसुद्धा केस निरोगी होतात. ब्राह्मीचा हेअर मास्क करून केसांना लावल्यास केस चमकदार आणि मऊ होतात. शिवाय मार्केटमध्ये ब्राह्मीची पावडरसुद्धा मिळते. ती पावडर आणून त्यात आवश्यकतेनुसार गुलाबजल, ऍलोवेरा जेल यांचे मिश्रण करून हेअर मास्क केसांना लावल्यास केस गळण्याचे कमी होतात. केसांची चांगली वाढ होते. याशिवाय बाजारात ब्राह्मीचे तेलसुद्धा उपलब्ध असते. ब्राह्मीचे तेल केसांच्या मुळांशी लावून अलगद मसाज केल्याने केस मजबूत होतात. केस गळण्याचे थांबून केस वाढतात. तसेच दुभांगलेल्या केसांपासून आराम मिळतो.
संबंधित बातम्या