मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Fall Control: केसांना मजबूत करण्यासाठी लावा या ४ गोष्टी, होणार नाही हेअर फॉल

Hair Fall Control: केसांना मजबूत करण्यासाठी लावा या ४ गोष्टी, होणार नाही हेअर फॉल

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 23, 2024 03:09 PM IST

Hair Fall Solution: केस गळणे, कमकुवत होणे, कोरडे आणि निर्जीव होणे यामुळे तुम्ही देखील त्रस्त असाल तर या चार गोष्टी केसांना लावा. हे हेअर फॉलवर नियंत्रण ठेवण्यास मदत करेल आणि केसांना नवीन जीवन देईल.

Hair Fall Control: केसांना मजबूत करण्यासाठी लावा या ४ गोष्टी, होणार नाही हेअर फॉल
Hair Fall Control: केसांना मजबूत करण्यासाठी लावा या ४ गोष्टी, होणार नाही हेअर फॉल (unsplash)

Things to Control Hair Fall: केस गळणे ही अनेकांची समस्या असते. महिला असोत वा पुरुष, त्यांना केस कमकुवत होण्याने आणि तुटण्याचा त्रास होतो. केस मजबूत करण्यासाठी रासायनिक प्रोडक्टऐवजी नैसर्गिक उत्पादने वापरणे महत्वाचे आहे. विशेषत: केसांच्या मुळांना पोषण दिले तर केस लवकर मजबूत होऊ लागतात. केस मजबूत करण्यासाठी केसांना जास्त वेळ तेल लावण्याऐवजी या ४ गोष्टी लावा. केस गळती काही दिवसातच नियंत्रणात येईल. केसांची योग्य काळजी घेतली आणि काही घरगुती उपाय केले तर केस मजबूत होऊ शकतात. जाणून घ्या केसांसाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

हेअर मसाज

केसांना रात्रभर तेल लावण्याऐवजी शॅम्पू करण्याच्या फक्त एक ते दोन तास आधी तेल लावा. तसेच बोटांच्या मदतीने मसाज करा. त्यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि तेल सहज शोषले जाऊ शकते. त्यामुळे केसांना आवश्यक पोषण मिळते आणि केस गळणे थांबते.

एलोवेरा जेल

केसांच्या मुळांना एलोवेरा जेलने मसाज करणे देखील फायदेशीर आहे. केसांना नैसर्गिकरीत्या मॉइश्चरायझ करण्यासोबतच ते हायड्रेटही करते. सोबतच केसांना कंडिशन देखील करते. त्यामुळे केस कोरडे व निर्जीव होत नाहीत आणि तुटणे कमी होते.

एग मास्क

जर तुम्हाला तुमचे केस मजबूत करायचे असतील तर पार्लरमधून प्रोटीन केराटिन करण्याऐवजी घरीच अंड्याचा मास्क लावा. प्रथिने समृद्ध असल्याने जेव्हा तुम्ही केसांच्या मुळांवर अंडी लावता तेव्हा आवश्यक पोषण केसांच्या मुळांपर्यंत पोहोचते आणि त्यांना मजबूत करते.

ग्रीन टीने केस धुवा

जर तुम्हाला तुमचे केस कमकुवत आणि कोरडे होण्याची आणि तुटण्याची भीती वाटत असेल तर ग्रीन टीने केस धुवा. हे केसांचे फॉलिकल्स उघडण्याचे काम करतात. ज्यामुळे केस मजबूत होतात. ग्रीन टीमध्ये आढळणारे कॅटेचिन केस गळणे थांबवते. तसेच केस मजबूत होऊन रेशमी बनतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग