मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  केस गळती आणि वाढत्या वजनाकडे करु नका दुर्लक्ष, असू शकतात थायरॉईडची लक्षणे

केस गळती आणि वाढत्या वजनाकडे करु नका दुर्लक्ष, असू शकतात थायरॉईडची लक्षणे

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 13, 2023 01:36 PM IST

Health Tips: थायरॉईड ही एक अशी समस्या आहे जी स्त्री आणि पुरुष दोघांनाही त्रास देऊ शकते. ज्या लोकांना हा आजार होतो त्यांच्या शरीरात काही बदल दिसू लागतात. त्याची लक्षणे येथे पहा.

थायरॉईडची लक्षणे
थायरॉईडची लक्षणे

Symptoms of Thyroid: आजकाल अनेकांना थायरॉईडचा त्रास होतो. त्याच्या तावडीत आल्यानंतर रुग्णाला अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. शरीरातील काही दृश्‍यमान बदलांवरून तुम्हीही या आजाराला बळी पडत आहात याची खात्री करता येते. थायरॉईड ग्रंथी एक आवश्यक हार्मोन रेग्युलेटर आहे. परंतु हे विशेषतः स्त्रियांमध्ये शक्य आहे. आज आम्ही तुम्हाला थायरॉईड आणि त्याची लक्षणे सांगणार आहोत. जाणून घ्या

ट्रेंडिंग न्यूज

थायरॉईड म्हणजे काय?

थायरॉईड ही मानेजवळची ग्रंथी आहे. थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे जी मानेतील विंडपाइपच्या समोर असते. त्याचे काम हार्मोन्स नियंत्रित करणे आहे. शरीराच्या इतर भागांप्रमाणे, थायरॉईड फंक्शनला नियंत्रित आणि रेग्युलेट करणे देखील खूप महत्वाचे आहे. कारण हार्मोन लेव्हल मध्ये अचानक चढ-उतार झाल्यास शरीरात अनेक लक्षणे दिसू शकतात.

थायरॉईडची लक्षणे कोणती?

तुम्हाला थायरॉईडचा आजार असल्यास, तुम्हाला विविध लक्षणे दिसू शकतात. काही वेळा ही लक्षणे सामान्य असू शकतात. यामुळे तुमची लक्षणे थायरॉईडच्या समस्येशी संबंधित आहेत की नाही हे जाणून घेणे कठीण होऊ शकते. थायरॉईडची लक्षणे दोन गटांमध्ये विभागली जातात. खूप जास्त थायरॉईड हार्मोन (हायपरथायरॉईडीझम) आणि खूप कमी थायरॉईड हार्मोन (हायपोथायरॉईडीझम).

हायपरथायरॉईडीझमची लक्षणे

- चिडचिड आणि अस्वस्थता

- झोपेचा त्रास

- वजन कमी होणे

- वाढलेली थायरॉईड ग्रंथी

- स्नायूमध्ये कमकुवतपणा आणि थरथरी सुटणे

- अनियमित मासिक पाळी किंवा चुकलेली पाळी

- दृष्टी समस्या किंवा डोळ्यांमध्ये जळजळ

हायपोथायरॉईडीझमची लक्षणे

- थकवा जाणवणे

- वजन वाढणे

- अल्झायमर

- वारंवार आणि हेवी पीरियड्स

- कोरडे आणि खडबडीत केस

- कर्कश आवाज

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel