Hair Fall: केसांच्या वाढीपासून फायदेशीर आहेत या बिया, आटोक्यात येईल हेअर फॉलची समस्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Fall: केसांच्या वाढीपासून फायदेशीर आहेत या बिया, आटोक्यात येईल हेअर फॉलची समस्या

Hair Fall: केसांच्या वाढीपासून फायदेशीर आहेत या बिया, आटोक्यात येईल हेअर फॉलची समस्या

Feb 21, 2024 02:19 PM IST

Hair Care Tips: केसांची योग्य काळजी घेतली नाही तर केसांची वाढ थांबते. अशा परिस्थितीत लांब केस मिळवण्यासाठी तुम्ही या बियांचा वापर करा. याने केसांची वाढ होण्यासोबतच केस गळतीही थांबेल.

केसांच्या वाढीसाठी फायदेशीर सीड्स
केसांच्या वाढीसाठी फायदेशीर सीड्स (unsplash)

Seeds for Hair Growth: केसांच्या अनेक समस्यांपैकी केस गळणे आणि केसांची वाढ न होणे या सामान्य समस्या आहे. केस मजबूत करण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो. केसांची काळजी घेतली नाही तर त्यांची वाढ खुंटते, केस मोठ्या प्रमाणात गळू लागतात. या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही काही बियांची मदत घेऊ शकता. या सीड्स आरोग्यासाठी जशा फायदेशीर आहेत तशाच त्या केसांसाठी सुद्धा फायदेशीर आहे. तुम्ही या बियांचा तुमच्या आहारात किंवा घरगुती उपायांमध्ये समावेश करू शकता. जाणून घ्या केसांसाठी फायदेशीर असेलल्या या सीड्स कोणत्या आहेत.

मेथी

जेवणाची चव वाढवण्यासोबतच हे छोटे दाणे केसांसाठी फायदेशीर आहेत. या बिया केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या लोह, बायोटिन आणि प्रथिनांसह जीवनसत्त्वे आणि खनिजांनी युक्त असतात. केसांवर वापरण्यासाठी त्यांना रात्रभर भिजवा आणि नंतर पेस्ट तयार करा. ते दह्यात मिक्स करा आणि हेअर मास्कप्रमाणे टाळूवर लावा.

चिया सीड्स

प्रथिने, ओमेगा ३ फॅटी ॲसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध चिया सीड्स निरोगी केसांसाठी फायदेशीर असतात. या बिया हेअर मास्क म्हणून लावता येतात. या बिया अन्नामध्ये, स्मूदी आणि दह्यामध्ये मिक्स करा.

जवसाच्या बिया

जवसाच्या बियांमध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात असते. हे टाळूला आतून पोषण देतात आणि केसांच्या वाढीस देखील प्रोत्साहन देतात. या बिया बारीक करून पावडर बनवा आणि जेवणात खा. हे बिया तुम्ही हेअर पॅकमध्येही समाविष्ट करू शकता.

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर पोषक असतात. त्यामध्ये झिंक, लोह आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असतात, जे केसांची वाढ आणि मजबूतीसाठी मदत करतात. या बियांचा आहारात समावेश करा.

तीळ

काळे आणि पांढरे तीळ केसांसाठी फायदेशीर असतात. या बियांचा आहारात समावेश करा. किंवा तुम्ही टाळूच्या मसाजसाठी तिळाचे तेल वापरू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner